- News
- जिल्हा न्यूज
- क्रूरकर्मा काकू..!; इस्टेट अन् बदल्याच्या भावनेने ४ वर्षीय पुतण्याचा विहिरीत ढकलून खून
क्रूरकर्मा काकू..!; इस्टेट अन् बदल्याच्या भावनेने ४ वर्षीय पुतण्याचा विहिरीत ढकलून खून
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : सख्ख्या काकूनेच बदला व संपत्तीच्या हव्यासापोटी चार वर्षीय सार्थक सागर जाधव या बालकाचा विहिरीत ढकलून खून केल्याचे पोलीस तपासात सोमवारी (१२ ऑगस्ट) समोर आल्याने कन्नड तालुक्यातील माटेगावमध्ये खळबळ उडाली आहे. सुनीता गणेश जाधव (रा. माटेगाव) असे क्रूरकर्मा काकूचे नाव आहे. सार्थकचा मृतदेह विहिरीत संशयितरीत्या ३१ जुलैला आढळला होता. खेळताना तो विहिरीत […]
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : सख्ख्या काकूनेच बदला व संपत्तीच्या हव्यासापोटी चार वर्षीय सार्थक सागर जाधव या बालकाचा विहिरीत ढकलून खून केल्याचे पोलीस तपासात सोमवारी (१२ ऑगस्ट) समोर आल्याने कन्नड तालुक्यातील माटेगावमध्ये खळबळ उडाली आहे. सुनीता गणेश जाधव (रा. माटेगाव) असे क्रूरकर्मा काकूचे नाव आहे.
आपला मुलगा एका डोळ्याने अंध झाल्याला सार्थकच जबाबदार असल्याची खदखद सुनीतामध्ये होती. या घटनेपासून ती सार्थकबद्दल प्रचंड राग बाळगून होती. काही दिवसांपूर्वी सागरच्या पत्नीचे ऑपरेशन होऊन गर्भपिशवी काढून टाकण्यात आली. भविष्यात तिला मूलबाळ होणार नाही, हे सुनीताला माहीत होते. त्यामुळे सार्थकला संपविले तर बदलाही पूर्ण होईल अन् सर्व शेती आपल्या मुलांना मिळेल, असा विचार सुनीताच्या डोक्यात आला.
सार्थकचा काटा काढण्याच्या संधीच्या शोधातच सुनीता होती. ३१ जुलैला सकाळी अकराला तिला ही संधी मिळाली. सागर व त्याची पत्नी शेतात गेले होते, मुलगी शाळेत गेली होती. सार्थक घरात एकटाच होता. ही संधी साधून सुनीताने सार्थकला उचलून घरापासून काही अंतरावरील विहिरीकडे नेले व विहिरीत त्याला फेकून दिले. सार्थकचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर सुनिता काही झालेच नाही, अशा अविर्भावात घरी आली. काही वेळाने सागर जाधव आणि त्याची पत्नी घरी आले तेव्हा सार्थक दिसत नव्हता. सर्वजण त्याला शोधू लागले. सुनीताही त्याला शोधण्याचे नाटक करत होती. अखेर देवगाव रंगारी पोलिसांना कळविण्यात आले. दुसऱ्या दिवशी १ ऑगस्टला सार्थकचा मृतदेह विहिरीत मिळून आला.
संशयास्पद वागण्यामुळे अडकली…
विहिरीत सार्थकचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना सुरुवातीपासून घातपाताचा संशय होता. त्यादृष्टीने त्यांचा तपास सुरू होता. चौकशीत त्यांना सुनीताचे वागणे खटकले. त्यांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण खाक्या दाखवताच खुनाची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तिला न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

