कसाबखेडा-रायपूरमध्ये होणार यंदाचा इज्तेमा, दीड लाखावर मुस्लिम बांधव होणार सहभागी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तब्लीक जमातर्फे दरवर्षी छत्रपती संभाजीनगरात इज्तेमाचे आयोजन केले जाते. यंदा शहरापासून ३६ कि.मी. अंतरावरील कसाबखेडा-रायपूर (ता. खुलताबाद) येथे ३ ते ५ जानेवारीदरम्‍यान इज्तेमा होणार आहे. त्याची तयारी दोन महिन्यांपासून सुरू असून, ३५० एकर जागेवर हा धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. इज्तेमासाठी जागा उपलब्‍ध करून देणारे ८५ टक्‍के हिंदू बांधव आहेत. अनेक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तब्लीक जमातर्फे दरवर्षी छत्रपती संभाजीनगरात इज्तेमाचे आयोजन केले जाते. यंदा शहरापासून ३६ कि.मी. अंतरावरील कसाबखेडा-रायपूर (ता. खुलताबाद) येथे ३ ते ५ जानेवारीदरम्‍यान इज्तेमा होणार आहे. त्याची तयारी दोन महिन्यांपासून सुरू असून, ३५० एकर जागेवर हा धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

इज्तेमासाठी जागा उपलब्‍ध करून देणारे ८५ टक्‍के हिंदू बांधव आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिके होती. मात्र तरीही त्‍यांनी या कार्यक्रमासाठी जमिनी दिल्याने संयोजक भारावून गेले. इज्तेमासाठी १ हजार बाय १ हजार मीटर आकाराचा भव्य मंडप उभारला जात आहे. भाविकांना थांबण्यासाठी सोय असेल. ९ ठिकाणी पार्किंग राहणार असून, ती प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र असेल. भाविकांना हातपाय धुण्यासाठी वजुखाने दोन ठिकाणी राहतील. तिन्ही दिवस पाच वेळेसची नमाज येथेच अदा केली जाईल. सध्या इज्तेमाच्या तयारीसाठी रोज हजारो स्वयंसेवक राबत असल्याचे चित्र आहे. ४० लाख लिटर क्षमतेचे शेततळे व दोन विहिरींद्वारे पिण्याचे पाणी आणले जाणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software