कन्‍नड शहरातून १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्‍नड शहरातील भीमनगरातून १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाले आहे. तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे तिच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्‍हटले आहे. मुली बाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा ती कोठे आहे याची माहिती असल्यास पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सी. […]

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्‍नड शहरातील भीमनगरातून १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाले आहे. तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे तिच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्‍हटले आहे. मुली बाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा ती कोठे आहे याची माहिती असल्यास पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सी. एच. मेंढके यांनी केले आहे.

रेखाबाई धनाजी आव्हाड (रा. हसनखेडा ह.मु. भीमनगर, कन्नड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्यांची मुलगी मानसी धनाजी आव्हाड (वय १६, रा. भीमनगर) ही घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेली. तिचा परिसरात शोध घेतला तरी सापडली नाही. २९ मे रोजी तिचे अपहरण झाले आहे. महिना उलटला तरी अजून तिचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मुलीचा रंग सावळा, उंची ५ फूट, बांधा सडपातळ, अंगात गुलाबी रंगाचे टॉप व पांढऱ्या रंगाची लेगिन्स पॅन्ट, नाक सरळ, कपाळावर गोंधलेले, तिला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. यासंदर्भातील वृत्त एका प्रसिद्ध दैनिकाने आजच्या अंकात दिले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software