कंपनीत कामावर निघालेल्या कामगाराला भरधाव कारने चिरडले!; पैठणची दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने कामगाराचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर- पैठण मार्गावरील जैन स्पिनर थांब्याच्या ठिकाणी शुक्रवारी (१८ ऑक्‍टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मुख्तार बाबा शेख (वय ३९, रा. मदिनानगर, मुधलवाडी, ता. पैठण) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे पैठण एमआयडीसीमधील कंपनीत कामाला दुचाकीने […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने कामगाराचा जागीच मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर- पैठण मार्गावरील जैन स्पिनर थांब्याच्या ठिकाणी शुक्रवारी (१८ ऑक्‍टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

मुख्तार बाबा शेख (वय ३९, रा. मदिनानगर, मुधलवाडी, ता. पैठण) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे पैठण एमआयडीसीमधील कंपनीत कामाला दुचाकीने (एमएच २० ईएच २२१८) जात होते. जैन स्पिनर थांब्याजवळ भरधाव कारने (एचएच १५ जीएफ ९१०३) त्यांना जोरात धडक दिली. त्यानंतर कारचालक योगेश सीताराम परसय्या (वय ३२, रा. कहारवाडा, पैठण) स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. गंभीर जखमी शेख यांना नागरिकांनी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शेख यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, पोलीस अंमलदार गणेश खंडागळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी जाऊन पंचनामा केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software