- News
- जिल्हा न्यूज
- एकाएकी गावावर तीन-चार ड्रोनच्या घिरट्या!; जुने कायगाव, गणेशवाडीतील ग्रामस्थांत खळबळ
एकाएकी गावावर तीन-चार ड्रोनच्या घिरट्या!; जुने कायगाव, गणेशवाडीतील ग्रामस्थांत खळबळ
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव आणि गणेशवाडी शिवारात शनिवारी (८ सप्टेंबर) रात्री ड्रोनने घिरट्या घातल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली. वेगवेगळ्या अफवा पसरल्या. कुणी म्हणे चोरट्यांचे रेकी करणारे ड्रोन आहे, तर कुणी आणखी काहीतरी चर्चा घडवून आणत होतं… पण खरे कारण समोर येत नसल्याने हैराण ग्रामस्थांनी गंगापूर पोलिसांना कळवले. पोलीस यासंदर्भात आता माहिती घेत […]
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव आणि गणेशवाडी शिवारात शनिवारी (८ सप्टेंबर) रात्री ड्रोनने घिरट्या घातल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली. वेगवेगळ्या अफवा पसरल्या. कुणी म्हणे चोरट्यांचे रेकी करणारे ड्रोन आहे, तर कुणी आणखी काहीतरी चर्चा घडवून आणत होतं… पण खरे कारण समोर येत नसल्याने हैराण ग्रामस्थांनी गंगापूर पोलिसांना कळवले. पोलीस यासंदर्भात आता माहिती घेत आहेत. रात्रभर ग्रामस्थांनी खडा पहारा दिला. या ड्रोनचे गौडबंगाल कायम आहे.
जुने कायगाव -गंगापूर रस्त्यावरील कायगाव पेपरमिलजवळ शेतवस्त्यांत राहणाऱ्या शेतकऱ्यांना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास तीन-चार ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसले. शेत आणि घरांवरून ड्रोन गेल्याने घाबरलेल्या शेतकऱ्यांनी आपसात फोनाफोनी सुरू केली. मात्र खुलासा होत नसल्याने अखेर गंगापूर पोलिसांना कळविण्यात आले. जुनी गणेशवाडी शिवार, जुने कायगाव शिवार आणि गंगापूर रस्त्याच्या जवळपास ड्रोननी घिरट्या घातल्या. आवाज अन् त्यात चमकणाऱ्या लाइटमुळे ते सहज ओळखता आले. ड्रोन कोण हाताळत होते, रात्रीच घिरट्या कशासाठी? याबद्दल शेतकऱ्यांचा शंका-कुशंका निर्माण झाल्या. पोलिसांच्या गस्ती पथकाने येऊन पाहणी केली. त्यांनाही ड्रोन दिसले. शेतकरी मध्यरात्री १२ पर्यंत ड्रोनच्या मागावर होते. रात्रभर शेतकऱ्यांनी सतर्क राहून पहारा दिला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

