अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधब्‍यावर रिल्स, फोटोसेशनला बंदी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फर्दापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसर सध्या धोकादायक बनला आहे. त्‍यातच पावसाळी पर्यटन करणाऱ्यांची गर्दी होत आहे. त्‍यामुळे या ठिकाणी धोकादायक रील्स, सेल्फी अथवा फोटोसेशन करण्यावर फर्दापूर पोलिसांनी बंदी घातली आहे. या परिसरात कोणताही पर्यटक असे कृत्य करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी […]

फर्दापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसर सध्या धोकादायक बनला आहे. त्‍यातच पावसाळी पर्यटन करणाऱ्यांची गर्दी होत आहे. त्‍यामुळे या ठिकाणी धोकादायक रील्स, सेल्फी अथवा फोटोसेशन करण्यावर फर्दापूर पोलिसांनी बंदी घातली आहे. या परिसरात कोणताही पर्यटक असे कृत्य करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिला आहे.

सध्या अजिंठा लेणी परिसर पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. हिरव्यागार डोंगररांगा, त्यावरून वाहणारे धबधबे आणि खाली उतरणारे ढग अशा विहंगम दृश्य डोळ्यांत साठविण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. देश-विदेशातील पर्यटकांबरोबरच स्थानिक पर्यटकही मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र अनेक जण अतिउत्साहात स्वतःच्या जिवाला धोका निर्माण करतात. यापूर्वीही अशा धोकादायक घटना या परिसरात घडल्या आहेत. राज्यातील वाढत्‍या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर फर्दापूर पोलीस सतर्क झाले असून, त्‍यांनी सप्तकुंड धबधबा व लेणी परिसरात धोकादायक रील्स तथा फोटोसेशन करण्यावर बंदी आणली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software