- News
- सिटी डायरी
- फायलींचा गतिमान प्रवास, तक्रारींचा निपटाराही जलद; छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या जादूवर भाळले...
फायलींचा गतिमान प्रवास, तक्रारींचा निपटाराही जलद; छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या जादूवर भाळले राज्य सरकार; म्हणाले, राज्यभर असेच काम झाले पाहिजे!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मंडळ अधिकारी हे महसूल प्रशासनातील महत्वाचे पद. ते बळकट केले तर प्रशासन गतीने पळते, हे ओळखून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तसे बदल केले आणि जादू झाली. फायलींचा गतिमान प्रवास झाला. तक्रारींचा निपटाराही जलद होऊ लागला. आता राज्य सरकारने अगदी अशीच कार्यपद्धती राज्यभर लागू करण्यासाठीचे आदेश काढले आहेत. शासनाच्या या आदेशामुळे जिल्हाधिकारी स्वामी यांच्या कौशल्यपूर्ण कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
-सज्जा चावडीमध्ये ग्राम मसुल अधिकारी आणि मंडळ कार्यालयातील उपस्थिती व कामकाजाच्या वेळेबाबत यापुढे मंडळ अधिकारी पर्यवेक्षण करतील.
-राज्यातील सर्व जिल्हाधिकारी अध्यदेशातील सर्व सुचनांनुसार आढावा घेतील.
-जिल्हाधिकारी सर्व मंडळ कार्यालयांना तातडीने आपले सरकार केंद्र मंजूर करतील.
-मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयातील उपस्थितीचे दिवस निश्चित केले जातील.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले...
महसूल सहायक, मंडळ अधिकारी यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठे अधिकार असतात. त्यांनी जनतेला न्याय द्यावा, प्रशासनात सुधारणा व्हावी या हेतूने पत्र काढून काही सूचना दिल्या होत्या. त्यांचा सकारात्मक परिणाम झाला. लोकांना न्याय जलद मिळायला लागला. आता राज्य सरकारने हीच कार्यपद्धती स्वीकारली, याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो.

