EXCLUSIVE : विद्यापीठ स्थापन होण्यापूर्वी असलेल्या शेतात होती मंदिरे!; ३०० वर्षांचा इतिहास…; समितीने ठरवली अतिक्रमणे, आता मुख्यमंत्री घेणार निर्णय, प्रशासनाला प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १२ धार्मिक स्थळे हटविण्याचे खंडपीठाचे आदेश आहेत. त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी (४ ऑक्‍टोबर) सकाळी बुलडाणा येथे जाण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावर काही वेळ थांबले. यावेळी त्‍यांनी महापालिका प्रशासक, पोलिस आयुक्तांना धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी शासनाकडे त्वरित प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १२ धार्मिक स्थळे हटविण्याचे खंडपीठाचे आदेश आहेत. त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी (४ ऑक्‍टोबर) सकाळी बुलडाणा येथे जाण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावर काही वेळ थांबले. यावेळी त्‍यांनी महापालिका प्रशासक, पोलिस आयुक्तांना धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी शासनाकडे त्वरित प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. प्रस्ताव पाठवताना खंडपीठाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही केली. यामुळे तूर्त कुठलीही कारवाई होणार नाही, हे स्‍पष्ट झाले आहे.

खंडपीठाच्या आदेशावरून धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यासाठी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त, पोलीस आयुक्‍तांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने १२ धार्मिक स्थळांची अतिक्रमणे घोषित केली आहे. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले, की मी आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी धार्मिक स्थळांच्या मुद्यावर होत असलेल्या विरोधाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यांनी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवा, आम्ही नियमित करण्यासाठी विचार करू, असे सांगितले आहे.

प्रशासनाची कोंडी…
धार्मिक स्थळांना पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्यानंतर विविध पक्ष, संघटनांकडून कडाडून विरोध सुरू झाला आहे. त्‍यामुळे प्रशासनाची कोंडी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिल्यामुळे प्रशासनाची या कोंडीतून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

बौद्ध बांधवांचा ७ ऑक्‍टोबरला मोर्चा
विद्यापीठ कार्यक्षेत्राच्या बाहेर असलेल्या बौद्ध विहार आणि विपश्यना केंद्रालाही पोलिसांनी गेल्या आठवड्यात नोटीस बजावली होती. त्यामुळे बौद्ध बांधवांनी संताप व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्यासह विविध मागण्यांसाठी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राच्या स्थापनेला ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असून, वा वास्‍तूंचे बांधकाम विद्यापीठाच्या जागेवर नाही.

विहिंपचेही निवेदन…
विद्यापीठ परिसरातील मंदिरे व विपश्यना केंद्रे ३०० वर्षांपासून आहेत. विद्यापीठासाठी संपादित केलेल्या शेतात ही मंदिरे होती. समिती ना पुरातत्‍व खात्‍याचा तज्‍ज्ञ होता, ना मंदिरांचा अभ्यासक. त्‍यामुळे समितीचा अहवालच चुकीचा आहे. नव्या समिती स्थापन करून नवीन अहवाल द्यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाकडून स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी आ. संजय सिरसाट यांच्यासह विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software