२१ वी पशुगणना सप्टेंबरपासून; चार महिने चालणार मोहीम

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस येत्या सप्टेंबर महिन्यापासून प्रारंभ होणार आहे. चार महिने म्हणजे ३१ डिसेंबर पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. दर तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यात एकूण २३६ प्रगणक व ५२ पर्यवेक्षकांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस येत्या सप्टेंबर महिन्यापासून प्रारंभ होणार आहे. चार महिने म्हणजे ३१ डिसेंबर पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. दर तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यात एकूण २३६ प्रगणक व ५२ पर्यवेक्षकांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी.डी. झोड यांनी कळविले आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते. यंदाची पशुगणना दि.१ सप्टेंबर पासुन सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी केली जात आहे. पशुगणनेसाठी प्रगणकाची नेमणुक केली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात ग्रामिण भागात १४१६ गावांसाठी १६८ प्रगणक व ३५ पर्यवेक्षक असून शहरी भागासाठी २३१ वार्डांसाठी ६८ प्रगणक व १७ पर्यवेक्षक असे एकूण २३६ प्रगणक व ५२ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.

पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. या मोहिमेत गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह यांची गणना केली जाणार आहे. या पशुगणनेच्या अनुसार शासनाकडून धोरण योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे. त्यानुसार लसीकरण औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्याकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी द्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी केले.

पशुगणना आता मोबाईलवर

पाच वर्षापूर्वी पशुगणना झाली होती. त्यावेळी प्रगणकांना टॅब दिले होते. त्यावर माहिती भरुन घेतली होती. आता प्रगणकांना स्वत:चे मोबाईल वापरावे लागणार आहेत. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सॉफ्टवेअरवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे. प्रगणकांना मानधन आणि मोबाईल वापराचा वेगळा मोबदला दिला जाणार आहे,असे डॉ. झोड यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software