हजला गेलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या दोन भाविकांचा मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कटकगेट येथील रहीम अहेमद नजीब अहेमद (वय ४१) आणि छावणी येथील सय्यद अरशद सय्यद अब्दुल रहेमान (वय ६१) हे पवित्र हज यात्रेसाठी गेले होते. या दोन्ही भाविकांचा तिथेच मृत्‍यू झाल्याची बातमी शहरात आल्याने नातेवाइकांत शोककळा पसरली. रहीम अहेमद हे प्लॉटिंग व्यावसायिक होते. १८ मे रोजी पवित्र हज यात्रेला पत्नीसह गेले […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कटकगेट येथील रहीम अहेमद नजीब अहेमद (वय ४१) आणि छावणी येथील सय्यद अरशद सय्यद अब्दुल रहेमान (वय ६१) हे पवित्र हज यात्रेसाठी गेले होते. या दोन्ही भाविकांचा तिथेच मृत्‍यू झाल्याची बातमी शहरात आल्याने नातेवाइकांत शोककळा पसरली.

रहीम अहेमद हे प्लॉटिंग व्यावसायिक होते. १८ मे रोजी पवित्र हज यात्रेला पत्नीसह गेले होते. रविवारी (८ जून) दिवसभर इबादत केल्यानंतर रात्री मक्का येथील अजिजिया बिल्डिंग क्रमांक ४ येथे पोहोचले असता त्या ठिकाणीच त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची नमाज-ए-जनाजा मक्का येथे अदा करण्यात आली. तिथेच दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले आहेत. सय्यद अरशद हे निवृत्त एनसीसी अधिकारी होते. ते लहान भाऊ एटीएसचे फौजदार सय्यद आरेफ यांच्यासोबत हजला गेले होते. रविवारीच मगरीबच्या नमाजनंतर मक्का शरीफ येथे काबाची परिक्रमा करत होते. याचदरम्यान अचानक त्यांचे निधन झाले. सकाळी फजरच्या नमाजनंतर त्यांची हरम शरीफ येथे नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आली. तेथेच दफनविधी करण्यात आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software