- Marathi News
- सिटी डायरी
- सुरेवाडी जलमय, पैठण गेटवरील दुकानांत पाणी शिरले… छत्रपती संभाजीनगरात धो धो पावसाने कुठं काय झालं वाच...
सुरेवाडी जलमय, पैठण गेटवरील दुकानांत पाणी शिरले… छत्रपती संभाजीनगरात धो धो पावसाने कुठं काय झालं वाचा…
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी (९ जुलै) पावसाने जोरदार हजेरी लावली. १५ मंडळांत ३५.८ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, चित्तेपिंपळगाव मंडळात अतिवृष्टी झाली. या ठिकाणी १०८ मि. मी. पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातील सुरेवाडी जलमय झाली. गोकूळनगरला पाण्याने वेढा घातला, तर पैठण गेटवरील दुकानांत पाणी शिरले. उस्मानपुरा, कांचनवाडी, भावसिंगपुरा मंडळांत […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी (९ जुलै) पावसाने जोरदार हजेरी लावली. १५ मंडळांत ३५.८ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, चित्तेपिंपळगाव मंडळात अतिवृष्टी झाली. या ठिकाणी १०८ मि. मी. पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातील सुरेवाडी जलमय झाली. गोकूळनगरला पाण्याने वेढा घातला, तर पैठण गेटवरील दुकानांत पाणी शिरले. उस्मानपुरा, कांचनवाडी, भावसिंगपुरा मंडळांत जोरदार पाऊस झाला.

पावसाने सातारा, देवळाईतील अनेक वसाहतींना पाण्याने वेढा घातला, सर्वच वसाहती दलदलीत रुतल्या. संतप्त नागरिकांनी जबाबदार अधिकाऱ्यांना मंगळवारी सकाळी दोन तास देवळाई चौकात साचलेल्या पाण्यात बसवून प्रश्नांची सरबत्ती केली. सातारा-देवळाईकरांनी अनेक वर्षे चिखलमय रस्ते तुडविल्यानंतर नुकतेच या रस्त्यांचे सिमेंटीकरण केले होते. मात्र जलवाहिनी टाकण्यासाठी ते रस्ते खोदण्यात आल्याने ही स्थिती निर्माण झाली. देवळाई चौकात रस्त्याला नदी व तलावाचे स्वरूप आले. या स्थितीला कारणीभूत जलवाहिनी टाकणारी कंत्राटदार कंपनी जीव्हीपीआरचे महेश धुसे, बालेप्रसाद गुप्ता यांना नागरिकांनी बोलावून घेतले व साचलेल्या पाण्यात बसवून धारेवर धरले. खोदलेले रस्ते व्यवस्थित करून द्या, अशी मागणी माजी उपमहापौर राजू शिंदे, ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे पाटील, नितीन झरे पाटील, दिनेश राजेभोसले, सचिन वाहूळ, शिवाजी बचाटे, सुरेश कसबे, सदानंद पांडे, शरद जोशी, श्रीधर हिवाळे, सागर निकम, शिवाजी हिवाळे, भारत हिवाळे आदी नागरिकांनी यावेळी केली.
-पहिला कॉल : रिलायन्स मॉलशेजारील दिशा संकुलात पाणी साचले.
-दुसरा कॉल : त्रिमूर्ती चौकात एका दुकानात पाणी शिरले.
-तिसरा कॉल : जालना रोडवर झाड पडले.
-चौथा कॉल : शहाबाजार येथे पाणी तुंबले.
-पाचवा कॉल : नवयुग कॉलनीत पाणी साचले.
सहा कॉल : गोकूळनगर भागातील घरांत पाणी शिरले.

-माजी नगरसेविका ज्योती मोरे यांनी पावसाळी नियंत्रण कक्षाला विजयनगर भागात रस्त्यावर पाणी साचल्याचे कळवले. कर्मचाऱ्यांनी जेसीबीद्वारे पाण्याचा निचरा केला.
-स्मार्ट सिटीमार्फत जाधववाडी येथे उभारलेल्या बसडेपोसाठी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याने सुरेवाडी भागातील गोकुळनगर या छोट्या वसाहतीला पाण्याचा वेढा पडला. सुखना नदी पात्राचे पाणी या भागात साचले.
तालुकानिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)
छ. संभाजीनगर : १२३
पैठण : १७४
गंगापूर : १४६
वैजापूर : १७४
कन्नड : १३९
खुलताबाद : १३८
सिल्लोड : १६६
सोयगाव : १२४
फुलंब्री : १६३
एकूण : १४६
शहर व परिसरात झालेला पाऊस (मि. मी.मध्ये)
छ. संभाजीनगर : ५१
उस्मानपुरा : ३२
भावसिंगपुरा : ४७.५
कांचनवाडी : २८
चिकलठाणा : ६.३
चित्ते पिंपळगाव : १०८.५
करमाड : २८.५
लाडसावंगी : ७.५
हर्सूल : ३३.५
चौका : ११.५
कचनेर : १९.८
पंढरपूर : २८
पिसादेवी : ३०.३
शेकटा : ६३.५
वरूड काझी : ४०.८
एकूण : ३५.८
