सर्व्हेक्षण पथकांमार्फत पैशांच्या वापराबाबत करडी नजर; आढावा बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले निर्देश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर होण्याची शक्यता असू शकते, अशा संभाव्य ठिकाणी विविध सर्व्हेक्षण पथकांमार्फत करडी नजर ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निष्पक्ष व निर्भय वातावरणात निवडणुका व्हाव्या, या हेतूने जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणी होत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर होण्याची शक्यता असू शकते, अशा संभाव्य ठिकाणी विविध सर्व्हेक्षण पथकांमार्फत करडी नजर ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निष्पक्ष व निर्भय वातावरणात निवडणुका व्हाव्या, या हेतूने जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणी होत आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली असून निरीक्षक जिल्ह्यात दाखल होऊन त्यांचे कामकाजही सुरु झाले आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च निरीक्षक कोटापट्टी वाम्शी क्रिष्णन व सोभान सुत्रधार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड,उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, खर्च निरीक्षण नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

निर्देश देण्यात आले की, शहरातील व विविध मतदार संघातील असे क्षेत्र जेथे मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रलोभन म्हणून पैशांचा वापर झाला आहे, अथवा तसे होत असल्याची पार्श्वभुमी वा शक्यता आहे अशा ठिकाणी सर्व्हेक्षण पथकांची गस्त वाढवणे, पोलीस व सुरक्षा दलांची संख्या वाढवणे, असे भाग सिसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निरीक्षणात आणणे अशा उपाययोजना राबवाव्या. तसेच या भागात गुप्त माहिती कळविणारे दूत नेमून त्यांच्याद्वारे मिळणारी माहिती, नागरिकांकडून मिळणारी गुप्त माहिती या आधारे कारवाई करावी. रोख रकमांची होणारी वाहतुक याबाबत रिजर्व बॅंक तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार कारवाई करावी. त्यादृष्टिने संबंधित क्षेत्रातील पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करावे,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software