- News
- सिटी डायरी
- विधानसभा निवडणूक : दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकांचे सत्र!; ४८ अन् ७२ तासांत काय करायचे हे ठर...
विधानसभा निवडणूक : दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकांचे सत्र!; ४८ अन् ७२ तासांत काय करायचे हे ठरले… मनपा, जि.प.ही निवडणुकीसाठी सज्ज
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून निवडणूक निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, १६ ऑक्टोबरला यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, कार्यालय […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून निवडणूक निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, १६ ऑक्टोबरला यंत्रणेला दिले.

सर्वच केंद्र शासनाचे व राज्य शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मालकीचे, सार्वजनिक ठिकाणांवरील, मालमत्तेवरील, भूखंड, इमारती, जागा, संरक्षक भिंती मैदाने व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील, रुग्णालये, दवाखाने, हॉल्स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, परिसर, पुल, उड्डाणपूल, विद्युत खांब, टेलिफोनचे खांब, बस, रेल्वे, विमाने, हेलिकॉप्टर, सर्व निमशासकीय वाहने, रुग्णवाहिका आदींवरील राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्यक्ती यांचे उभारलेले, स्थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्सम प्रचार साहित्य, जाहिराती निदर्शनास येऊ नये यासाठी त्यांना झाकणे, आवेष्टीत करणे.

सर्व खासगी ठिकाणांवरील, मालमत्तेवरील, भूखंड, घरे, कार्यालये, इमारती, दुकाने, संरक्षक भिंती, आस्थापना व सर्वच खासगी ठिकाणे, रुग्णालये, दवाखाने, हॉल्स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, सर्व खासगी वाहने, बस, रेल्वे, विमाने, हेलिकॉप्टर, रुग्णवाहिका इत्यादी राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्यक्ती इत्यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्सम प्रचार साहित्य निदर्शनास येऊ नये. यासाठी त्यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्टीत करणे.
महापालिका आयुक्त म्हणाले…
मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितले की, महानगरपालिका हद्दीत असलेल्या विधानसभा मतदारसंघांत आचारसंहिता अंमलबजावणी, मतदार जनजागृती, मतदारांना मतदान केंद्रावर द्यावयाच्या सुविधांबाबत पूर्तता करण्यात मनपा प्रशासन सक्रियतेने कामकाज करीत असून यासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले जाईल.
जि. प. सीईओ म्हणाले…
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया कालावधी पाहता सर्व आवश्यक पूर्वतयारी करून सर्व यंत्रणांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. मतदारांना निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आचारसंहिता अंमलबजावणी काटेकोरपणे करावी.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले…
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, की सर्व विभागांनी आपापसात समन्वय व संवाद राखून आचारसंहिता अंमलबजावणीची व निवडणूक प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करावी. विधानसभा मतदारसंघनिहाय या सर्व कार्यवाहीसाठी सर्व यंत्रणांना समन्वय असणे आवश्यक आहे. सर्व नियमांची माहिती व अभ्यास करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावरून आवश्यकतेनुसार मार्गदर्शन सुविधाही उपलब्ध असेल असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम
मंगळवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी,
मंगळवार दि.२९ ऑक्टोंबर रोजी नामनिर्देशन सादर करण्याचा अंतिम दिनांक,
बुधवार दि.३० ऑक्टोंबर रोजी नामनिर्देशपत्र छाननी
सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल
बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान
शनिवार दि.२३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी
सोमवार दि.२५ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण

