विद्यापीठ १ सप्टेंबरला घेणार ‘पेट’; उद्यापासून Online नोंदणी, असा आहे Timetable

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सन २०२१ नंतर आता सहावी पीएच. डी. एन्ट्रन्स टेस्ट (पेट) घेण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. यासाठी १ जुलैपासून ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. मागच्या परीक्षेप्रमाणे यावेळीही सप्टेंबरमध्ये ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. यासाठी पदव्युत्तर पदवी (बी प्लस श्रेणी उत्तीर्ण) विद्यार्थी नोंदणी करू शकतील. पेटसाठी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सन २०२१ नंतर आता सहावी पीएच. डी. एन्ट्रन्स टेस्ट (पेट) घेण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. यासाठी १ जुलैपासून ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. मागच्या परीक्षेप्रमाणे यावेळीही सप्टेंबरमध्ये ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. यासाठी पदव्युत्तर पदवी (बी प्लस श्रेणी उत्तीर्ण) विद्यार्थी नोंदणी करू शकतील.

पेटसाठी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिष्ठाता मंडळाची बैठक झाली आणि वेळापत्रकास अंतिम मान्यता देण्यात आली. एकूण ३३ विषयांसाठी परीक्षा होणार आहे. सन २०१० मध्ये पहिली पेट घेण्यात आली. त्यानंतर २०१३, २०१६, २०१८ आणि २०२१ मध्येही परीक्षा झाली. पाचव्या पेटचा पहिला पेपर जानेवारी २०२१, तर दुसरा पेपर १३ मार्च २०२१ रोजी झाला होता. पाचवी पेट ४५ विषयांसाठी घेण्यात आली व त्यात ४ हजार २९९ विद्यार्थी पात्र झाले होते. आताची सहावी पेट ही ३३ विषयांसाठी घेतली जाणार आहे. १ जुलैपासून पेटसाठी नोंदणी सुरू होणार असून, त्याच दिवशी विषयनिहाय संशोधकांच्या रिक्त जागांची संख्या उपलब्ध होणार आहे, असे परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी पत्रकारांना सांगितले.

असे आहे वेळापत्रक…
ऑनलाइन नोंदणी : ०१ ते २० जुलै
कागदपत्रांची पडताळणी : २८ जुलै ते ८ ऑगस्ट
प्राथमिक यादी जाहीर : १४ ऑगस्ट रोजी
अंतिम यादी जाहीर : २९ ऑगस्ट रोजी
पेट परीक्षा : १ सप्टेंबर रोजी
निकाल : १२ सप्टेंबर रोजी

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software