- News
- सिटी डायरी
- मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरात ११ ते २३ ऑगस्टदरम्यान सैन्यभरती
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरात ११ ते २३ ऑगस्टदरम्यान सैन्यभरती
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अग्निपथ योजनेअंतर्गत छावणीतील सैन्य भरती कार्यालयात ११ ते २३ ऑगस्ट दरम्यान सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे भरती संचालक कर्नल अनूज सिंघल यांनी कळविले आहे. छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ९ जुलै २०२४ रोजी झालेल्या ऑनलाईन […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अग्निपथ योजनेअंतर्गत छावणीतील सैन्य भरती कार्यालयात ११ ते २३ ऑगस्ट दरम्यान सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे भरती संचालक कर्नल अनूज सिंघल यांनी कळविले आहे.
११ ऑगस्ट : सर्व जिल्ह्यांतील उमेदवार- अग्निवीर ऑफिस असिस्टन्स , स्टोअर किपर टेक्निकल पदांसाठी. परभणी जिल्ह्यातील उमेदवार- अग्निवीर जनरल ड्युटी.
१२ ऑगस्ट : नांदेड-अग्निवीर जनरल ड्युटी.
१३ ऑगस्ट : छत्रपती संभाजीनगर(छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद तालुका)-अग्निवीर जनरल ड्युटी.
१४ ऑगस्ट : छत्रपती संभाजीनगर( पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव,वैजापूर तालुका) -अग्निवीर जनरल ड्युटी.
१५ ऑगस्ट : जळगाव(अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, मुक्ताईनगर तालुका) – अग्निवीर जनरल ड्युटी.
१६ ऑगस्ट : जळगाव(बोदवड, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर आणि पाचोरा तालुका)-अग्निवीर जनरल ड्युटी.
१७ ऑगस्ट : जळगाव(पारोळा,रावेर,यावल तालुका), जालना(बदनापूर, भोकरधन,धनसावंगी आणि जालना)- अग्निवीर जनरल ड्युटी.
१८ ऑगस्ट : जालना(अंबड, जाफराबाद,मंठा,परतूर), हिंगोली(सर्व तालुके) -अग्निवीर जनरल ड्युटी.
१९ ऑगस्ट : बुलडाणा(बुलडाणा,चिखली,देऊळगाव राजा,जळगाव जामोद, खामगाव, लोणार,मलकापूर) )-अग्निवीर जनरल ड्युटी.
२० ऑगस्ट : बुलडाणा (मेहकर, मोताळा, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव आणि सिंदखेडराजा) -अग्निवीर जनरल ड्युटी.
सर्व जिल्हे अग्निवीर टेकनिकल (ऑलआर्म्स), अग्निवीर ट्रेड्समन ८ वी पास (ऑलआर्म्स)
२१ऑगस्ट : सर्व जिल्हे अग्निवीर ट्रेड्समन १० वी पास (ऑलआर्म्स)
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

