महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राजपत्रित नागरी संयुक्त पूर्व परीक्षा १ डिसेंबरला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६१ केंद्र

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (१ डिसेंबर) सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर ६१ उपकेंद्रांवर एकूण १९ हजार १०४ उमेदवारांच्या परीक्षेची सोय करण्यात आली आहे. २१३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (१ डिसेंबर) सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर ६१ उपकेंद्रांवर एकूण १९ हजार १०४ उमेदवारांच्या परीक्षेची सोय करण्यात आली आहे. २१३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड यांनी दिली आहे.

परीक्षा केंद्रांची यादी व कंसात परीक्षार्थिंची संख्या

  1. न्यू हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, पिसादेवी रोड, भगतसिंगनगर, हर्सूल (312)
  2. मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉर्मस, रोजा बाग, हर्सुल रोड, (टॉम पॅट्रीक बिल्डींग पार्ट – ए ) (288)
  3. मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉर्मस, रोजा बाग, हर्सुल रोड, (टॉम पॅट्रीक बिल्डींग पार्ट – बी) (432)
  4. नुतन बहुउद्देशिय विद्यालय जळगाव रोड, हडको एन-11 हर्सुल (192)
  5. एस.बी.ओ.ए. पब्लिक स्कूल, प्लॉट नं 51, सिडको जळगाव रोड (288)
  6. गोदावरी पब्लिक स्कूल (सेकंडरी) विवेकानंद नगर एन-12 हडको, (312)
  7. बळीराम पाटी हाय स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, सिडको एन-9 एम-2 (312)
  8. श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला एन-8 सिडको, (312)
  9. धर्मवीर संभाजी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक स्कूल एन-5 सिडको जवळ संत तुकाराम नाटयगृह (312)
  10. जिजामाता कन्या विद्यालय, एन – 5 सिडको (240) सिडको जवळ संत तुकाराम नाटयगृह जवळ
  11. एम.जी.एम. जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महाविद्यालय एन-6 सिडको, सेट्रंल नाका जवळ, (480)
  12. एम.जी.एम. पॉलिटेक्निक एन-6 सिडको, सेट्रंल नाका जवळ, (312)
  13. एम.जी.एम. संस्कार विद्यालय, एन-6 सिडको, सेट्रंल नाका जवळ (240)
  14. राजर्षी शाहू इन्सिट्युट ऑफ मॅनेजमेंट पी-75 , गरवारे पॉलीस्टर एम.आय.डी.सी. (312) चिकलठाणा.
  15. वसंतराव नाईक महाविद्यालय, लेमन ट्री जवळ, चिकलठाणा रोड, (312)
  16. शिव छत्रपती महाविद्यालय, एन-3 जालना रोड, सिडको, (480)
  17. सेंट.मीरा विद्यालय प्लॉट नं 119/बी, एन-3 सिडको,(288)
  18. सेंट.मीरा विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज प्लॉट नं 119/बी, एन-3 सिडको,(288)
  19. मराठवाडा तंत्रज्ञान व संस्था (एमआयटी) हायस्कूल आणि माहिती तंत्रज्ञान कॉलेज एन-4 सिडको (288)
  20. डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन नवखंडा ज्युबली पार्क (432)
  21. हॉली क्रास मराठी हायस्कूल, लक्ष्मी कॉलनी, कॅन्टामेंट बोर्ड (288)
  22. पी.ई.एस. कॉलेज ऑफ अभियांत्रिकी, पानचक्की रोड, नागसेनवन (408)
  23. पी.ई.एस. पॉलिटेक्निक पानचक्की रोड, नागसेनवन (288)
  24. मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल नागसेनवन (288)
  25. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉर्मस नागसेनवन (288)
  26. विवेकानंद आर्टस्‌ आणि सरदार दिलीपसिंग कॉर्मस कॉलेज समर्थनगर (288)
  27. विवेकानंद कॉलेज ऑफ सायसन्स समर्थ नगर (288)
  28. एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ सायन्स औरंगपूरा (288)
  29. एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ आर्टस आणि कॉर्मस पार्ट – ए औरंगपुरा (432)
  30. एस.बी.ई.एस. कॉलेज ऑफ आर्टस आणि कॉर्मस पार्ट – बी औरंगपुरा (432)
  31. सरस्वती भुवन मुलाची शाळा, औरंगपुरा (432)
  32. महिला मंडळ संचलित शिशु विहार हायस्कूल, बलवंत वाचनालयाच्या बाजूला औरंगपुरा (288)
  33. ए.के. वाघमारे प्रशाला सरस्वती नगर, औरंगपुरा (288)
  34. डॉ.सौ. इंद्राबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय, आर्टस, समर्थ नगर (288)
  35. वसंतदादा पाटील हायस्कूल, धुत हॉस्पीटल जवळ, रामनगर, एन-2 सिडको, जालना रोड (288)
  36. शिवाजी हायस्कूल खोकडपूरा, शिवाजी नगर (240)
  37. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा (288)
  38. शासकीय पॉलिटेक्निक, उस्मानपुरा (312)
  39. देवगिरी महाविद्यालय, (ज्युनिअर कॉलेज बिल्डींग, तिसरा माळा) स्टेशन रोड, उस्मानपुरा पार्ट (बी) (480)
  40. देवगिरी महाविद्यालय, (ज्युनिअर कॉलेज बिल्डींग, तिसरा माळा) स्टेशन रोड, उस्मानपुरा पार्ट (सी) (240)
  41. नागसेन विद्यालय फुले नगर पिर बाजार, उस्मानपुरा (312)
  42. जी.एस.मंडल महाराष्ट्र इन्सिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (बी.टेक) गेट नं.5 सातारा गाव, बीड बायपास रोड (456)
  43. मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, नागसेन वन (384)
  44. मिलिंद कॉलेज ऑफ आर्टस, नागसेन वन (288)
  45. जय भवानी हायस्कूल, आर्टस ॲण्ड सायसन्स कॉलेज जय विश्व भारती कॉलनी गारखेडा परिसर (240)
  46. शासयकीय महाविद्यालय, आर्टस आणि विज्ञान, सुभेदारी गेस्ट हाऊस जवळ विश्वास नगर (240)
  47. सेट.फ्रान्सिस डे सेल्स हाय स्कूल, 7 हिल जवळ, जालना रोड, (384)
  48. हॉली क्रॉस इंग्लिश हाय स्कूल, बंगलो नं.12 नगर रोड, छावणी परिसर (312)
  49. डॉ.रफिक झकेरिया सेंटर उच्च शिक्षण आणि प्रगत संशोधन केंद्र,मौलाना आझाद आर्टस, सायन्स आणि वाणिज्य
    महाविद्यालय, हर्सुल रोड (240)
  50. सुशीलादेवी देशमुख विद्यालय, सिडको एन – 2 रामनगर (288)
  51. श्रीराम माध्यमिक विद्यालय, राम नगर (192)
  52. मुकुल मंदिर हायस्कूल, एन -7 सिडको, रामनगर (192)
  53. शासकीय फार्मसी महाविद्यालय, उस्मानपुरा (192)
  54. देवगिरी इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट स्टडीज पार्ट – अ (360)
  55. देवगिरी इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट स्टडीज पार्ट – ब (360)
  56. जी.एस.मंडळ मराठवाडा इंस्टिट्यूट तंत्रज्ञान (एमआयटी) गेट नं-3 सातारा परिसर, बीड बायपास रोड (312)
  57. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ महाविद्यालय, नागसेन वन (240)
  58. शहीद भगतसिंग हाय स्कूल प्लॉट नं – 61, महाराणा प्रताप चौक बजाज चौक (288)
  59. दगडोजीराव देशमुख कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बजाज नगर (मोरे चौक) (240)
  60. लेट भारीमोल तनवाणी विद्यामंदीर, प्लॉट नं.92 एम.आय.डी.सी. बजाजनगर वाळूज (312)
  61. राजा शिवाजी विद्यालय, बजाज नगर वाळूज (288)

परीक्षार्थिंसाठी सूचना

  1. परीक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
  2. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र काळ्या व निळ्या शाईचे बॉल पाँईट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.
  3. उमेदवारास त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटूथ, कॅमेरा किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केंद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षाकरीता बंदी घालण्यात येईल.
  4. सुधारीत कार्यपद्धतीनुसार प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेच्या अर्धा तास पूर्वीपर्यंत (सकाळी 9.30 पर्यंतच) उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देणे आवश्यक आहे.
  5. परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही कारणास्तव अशा उमेदवारास प्रवेश देण्याचे प्राधिकार आयोगाच्या परस्पर कोणत्याही व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले नाहीत.
  6. प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यांनतर परीक्षा उपकेंद्राचे प्रवेशद्वार बंद करुन घेण्यात यावे.
  7. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
  8. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software