महाराष्ट्र राजपत्रित नागरी संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑगस्टला; छ. संभाजीनगरातील ४६ केंद्रांवर १४ हजार ७८४ उमेदवारांची व्यवस्था

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 रविवार दि.25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 या अशा दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर 46 परीक्षा केंद्रांवर एकूण 14 हजार 784 उमेदवारांच्या परीक्षेची सोय करण्यात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 रविवार दि.25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 या अशा दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर 46 परीक्षा केंद्रांवर एकूण 14 हजार 784 उमेदवारांच्या परीक्षेची सोय करण्यात आली असून 1572 अधिकरी- कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.

परीक्षा केंद्रांची यादी व कंसात परीक्षार्थींची संख्या याप्रमाणे

  1. न्यु हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, पिसादेवी रोड, भगतसिंगनगर, हर्सुल (312)
  2. मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (सायसन्स बिल्डिंग भाग- अ) रोजा बाग, हर्सुल रोड, (288)
  3. मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय(टॉम पॅट्रीक बिल्डींग पार्ट – ब) रोजा बाग, हर्सुल रोड, (432)
  4. नुतन बहुउद्देशिय विद्यालय जळगाव रोड, हडको एन-11 हर्सुल (192)
  5. एस.बी.ओ.ए. पब्लिक स्कूल, प्लॉट नं 51, सिडको जळगाव रोड (288)
  6. गोदावरी पब्लिक स्कूल (सेंकन्डरी) विवेकानंद नगर एन-12 हडको, (312)
  7. बळीराम पाटील विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, सिडको एन-9 एम-2 (312)
  8. श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला एन-8 सिडको, (312)
  9. धर्मवीर संभाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय एन-5 सिडको जवळ संत तुकाराम नाटयगृह (312)
    10.जिजामाता कन्या विद्यालय, एन – 5 सिडको (240) सिडको जवळ संत तुकाराम नाटयगृह जवळ
  10. एम.जी.एम. जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महाविद्यालय एन-6 सिडको, सेट्रंल नाका जवळ, (480)
  11. एम.जी.एम. पॉलिटेक्निक एन-6 सिडको, सेट्रंल नाका जवळ, (312)
  12. एम.जी.एम. संस्कार विद्यालय, एन-6 सिडको, सेट्रंल नाका जवळ (240)
  13. राजर्षी शाहू इन्सिट्युट ऑफ मॅनेजमेंट पी-75 , गरवारे पॉलीस्टर एम.आय.डी.सी. (312) चिकलठाणा.
  14. वसंतराव नाईक महाविद्यालय, लेमन ट्री जवळ, चिकलठाणा रोड, (312)
  15. शिव छत्रपती महाविद्यालय, एन-3 जालना रोड, सिडको, (480)
  16. संत मीरा शाळा, प्लॉट नं 119/बी, एन-3 सिडको,(288)
    18.संत मीरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्लॉट नं 119/बी, एन-3 सिडको,(288)
  17. मराठवाडा तंत्रज्ञान व संस्था (एमआयटी) हायस्कूल आणि माहिती तंत्रज्ञान कॉलेज एन-4 सिडको (288)
  18. डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन नवखंडा ज्युबली पार्क (432)
  19. हॉली क्रास मराठी हायस्कूल, लक्ष्मी कॉलनी, कॅन्टामेंट बोर्ड (288)
  20. पी.ई.एस. कॉलेज ऑफ अभियांत्रिकी, पानचक्की रोड, नागसेनवन (408)
  21. पी.ई.एस. पॉलिटेक्निक पानचक्की रोड, नागसेनवन (288)
  22. मिलिंद बहुउद्देशिय हायस्कूल नागसेनवन (288)
  23. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉर्मस नागसेनवन (288)
  24. विवेकानंद कला व सरदार दिलीपसिंह वाणिज्य महाविद्यालय समर्थ नगर (288)
  25. विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थ नगर (288)
  26. एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ सायन्स औरंगपूरा (288)
  27. एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ आर्टस आणि कॉर्मस (पार्ट – अ) औरंगपूरा (432)
  28. एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ आर्टस आणि कॉर्मस (पार्ट – ब) औरंगपूरा (432)
  29. सरस्वती भुवन मुलाची शाळा, औरंगपुरा (432)
  30. महिला मंडळ संचलित शिशु विहार हायस्कूल, बलवंत वाचनालयाच्या बाजूला औरंगपूरा (288)
  31. ए.के. वाघमारे प्रशाला सरस्वती नगर, औरंगपुरा (288)
  32. डॉ.सौ. इंद्राबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय, आर्टस, समर्थ नगर (288)
  33. पद्श्री वसंतदादा पाटील हायस्कूल, धुत हॉस्पीटल जवळ, रामनगर, एन-2 सिडको, जालना रोड (288)
  34. शिवाजी हायस्कूल खोकडपूरा, शिवाजी नगर (240)
  35. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा (288)
  36. शासकीय पॉलिटेक्निक, उस्मानपुरा (312)
  37. देवगिरी महाविद्यालय, (ज्युनिअर कॉलेज बिल्डींग, तिसरा माळा) स्टेशन रोड,
    उस्मानपुरा पार्ट (बी) (480)
  38. देवगिरी महाविद्यालय, (ज्युनिअर कॉलेज बिल्डींग, तिसरा माळा) स्टेशन रोड,
    उस्मानपुरा पार्ट (सी) (240)
  39. नागसेन विद्यालय फुले नगर पिर बाजार, उस्मानपुरा (312)
  40. जी.एस.मंडल महाराष्ट्र इन्सिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (बी.टेक) गेट नं.5 सातारा गाव,
    बीड बायपास रोड (456)
  41. मिलिंद विज्ञान महाविद्यालय, नागसेन वन (384)
  42. मिलिंद कला महाविद्यालय, नागसेन वन (288)
  43. जय भवानी विद्यामंदीर, माध्यमिक व उच्च माध्यमिक कला व विज्ञान विद्यालय, जय विश्व भारती कॉलनी, गारखेडा परिसर (240)
  44. शासकीय ज्ञान व विज्ञान महाविद्यालय,शासकीय सुभेदारी गेस्ट हाऊस जवळ विश्वास नगर (240)

परीक्षार्थिंसाठी सूचनाः

  1. परीक्षेस येतांना उमेदवारांने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
  2. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र काळ्या व निळ्या शाईचे बॉल पाँईट पेन, ओळखपत्र
    व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.
  3. उमेदवारास त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटूथ, कॅमेरा किंवा
    तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन
    जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर
    परीक्षा केंद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य
    ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य
    दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह
    त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षाकरीता बंदी घालण्यात येईल.
    4. सुधारीत कार्यपद्धतीनुसार प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेच्या अर्धा तास पूर्वीपर्यंत (सकाळी
    9.30 पर्यंतच) उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देणे आवश्यक आहे.
  4. परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही कारणास्तव अशा उमेदवारास प्रवेश देण्याचे प्राधिकार आयोगाच्या परस्पर कोणत्याही व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले नाहीत.
  5. प्रत्यक्ष परीक्षा सुरु झाल्यांनतर परीक्षा उपकेंद्राचे प्रवेशद्वार बंद करुन घेण्यात यावे.
  6. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
  7. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...

Latest News

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही... छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरात अनोळखी मृतदेह मिळून येण्याचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. १ ऑक्‍टोबरपासून...
सामाजिक कार्यकर्तीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शिवीगाळीचा भडीमार, पोलिसांनी २३ जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
लई हुशारी केली, पण शेवटी घडा भरलाच!; ‘कायद्या’चा गैरवापर करून लाखो रुपये उकळले, अखेर दुकलीला आता पडल्या बेड्या!!, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी, नक्की काय आहे स्टोरी वाचूया... 
मंजूरपुऱ्यातील ‘बॉस पब्लीक चॉईस’ रेडिमेड कपड्यांचे दुकान फोडले, चोरट्यांनी शर्ट-पँट नेले...
गोमटेश मार्केटमध्ये भल्ला चाट भंडारसमोर तरुणांमध्ये हाणामारी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software