महापालिकेतून : शहरातील १४ चौकांत २ कोटी खर्चून बसवणार स्मार्ट सिग्नल!; बांधकाम व्यावसायिकांसाठी १ जानेवारीपासून ४० टक्‍के टीडीआर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिकेने शहरात १४ ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गरवारे चौकात स्मार्ट सिग्नल सुरू केले असून, त्याचा वाहनधारकांना बराच फायदा होत असल्याचे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले. एका सिग्नलच्या उभारणीसाठी १४ लाख रुपये खर्च येणार असून, एकूण २ कोटी रुपये महापालिका […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिकेने शहरात १४ ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गरवारे चौकात स्मार्ट सिग्नल सुरू केले असून, त्याचा वाहनधारकांना बराच फायदा होत असल्याचे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले. एका सिग्नलच्या उभारणीसाठी १४ लाख रुपये खर्च येणार असून, एकूण २ कोटी रुपये महापालिका खर्च करणार असल्याचे गायकवाड म्हणाल्या.

सिल्लेखाना, शरद टी पॉइंट, हॉटेल कार्तिकी चौक, धूत हॉस्पिटल चौक, रेल्वे स्टेशनसमोरील चौक, महानुभाव आश्रम चौक, शहानूरमियाँ दर्गा चौक, समर्थनगर चौक, गजानन महाराज मंदिर चौक, केंब्रिज चौक, मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर, भाई उद्धवराव पाटील चौक, सावरकर चौक या चौकात अत्याधुनिक सिग्नल उभारण्यात येतील. वाहनांच्या वर्दळीनुसार सिग्नलच्या वेळा आपोआप कमी- जास्त होणार असल्याचे वाहनचालकांच्या वेळेची बचत होईल. चालकांना दूरवरून हे सिग्नल दिसतील.

१ जानेवारीपासून ४० टक्‍के टीडीआर; महापालिकेचा निर्णय
१ जानेवारी २०२५ पासून ४० टक्के टीडीआर वापरणे बांधकाम व्यावसायिकांसाठी महापालिकेने बंधनकारक केले आहे. उंच इमारतींसाठी सध्या २५ टक्के टीडीआर घेणे सक्तीचे आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software