- News
- सिटी डायरी
- मराठा बांधवांनी अर्धा तास रोखला केंब्रिज चौक; वाहनांच्या लागल्या रांगा, मनोज जरांगे यांच्या समर्थनार...
मराठा बांधवांनी अर्धा तास रोखला केंब्रिज चौक; वाहनांच्या लागल्या रांगा, मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ छ. संभाजीनगरात रास्ता रोको
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे सहा दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू असून, त्यांच्या समर्थनासाठी आज, २२ सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास मराठा बांधवांनी केंब्रिज चौक रोखून धरला. अर्धा तास रास्ता रोकोमुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सकल मराठा समाजाचे सुरेश […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे सहा दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू असून, त्यांच्या समर्थनासाठी आज, २२ सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास मराठा बांधवांनी केंब्रिज चौक रोखून धरला. अर्धा तास रास्ता रोकोमुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी क्रांती चौकातून मुस्लिम बांधवांनी आज, २२ सप्टेंबरला सकाळी पदयात्रा काढली. त्यांच्या रॅलीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने मोंढा नाका उड्डाणपुलाजवळच ही रॅली अडविण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रॅलीच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. क्रांती चौक ते अंतरवाली सराटी अशी ही पदयात्रा सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रवाना झाली होती. आम्हाला दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत पोलिस ठाण्यात डांबून ठेवल्याचे आयोजक कलीम सलीम पटेल म्हणाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

