बिल्डरच्या बनवाबनवीमुळे भंगले १८ कुटुंबांचे सुखी घराचे ‘ड्रिम’!; सिडकोकडून बिल्डरला अभय कशासाठी?

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिल्डरने अर्धवट कामे करून अपार्टमेंटमधील फ्‍लॅट विकले, पण राहायला आल्यानंतर निकृष्ण बांधकामाची प्रचिती रहिवाशांना आली. उरलेली कामेही करण्यास बिल्डरने टाळाटाळ केली. याबाबत सिडकोकडे वारंवार तक्रारी करूनही बिल्डरवर कारवाई झाली नसल्याची तक्रार जयहिंद पब्लिक शाळेजवळील (हिरापूर परिसर) ड्रिम कॉम्‍प्‍लेक्‍समधील रहिवाशांनी केली आहे. पाइप लाइन,दरवाजे, खिडक्या, ड्रेनेज लाइन निकृष्ट दर्जाची केली असून, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिल्डरने अर्धवट कामे करून अपार्टमेंटमधील फ्‍लॅट विकले, पण राहायला आल्यानंतर निकृष्ण बांधकामाची प्रचिती रहिवाशांना आली. उरलेली कामेही करण्यास बिल्डरने टाळाटाळ केली. याबाबत सिडकोकडे वारंवार तक्रारी करूनही बिल्डरवर कारवाई झाली नसल्याची तक्रार जयहिंद पब्लिक शाळेजवळील (हिरापूर परिसर) ड्रिम कॉम्‍प्‍लेक्‍समधील रहिवाशांनी केली आहे.

पाइप लाइन,दरवाजे, खिडक्या, ड्रेनेज लाइन निकृष्ट दर्जाची केली असून, भिंती, छताला प्लास्टरही व्यवस्थित केलेले नाही, ते खाली पडत आहे. भिंतींना भेगा पडल्या आहेत. अपार्टमेंटला पाणीपुरवठ्यासाठी कोणतीही विहीर अपार्टमेंटच्या जागेत नाही. बोअर बेकायदेशीर जागेत असून, त्‍याचे पाणीही बिल्डर परस्पर इतरांना विकतो. फ्‍लॅटधारकांना अद्यापही बिल्डरने भोगवटा प्रमाणपत्र दिलेले नाही. सोसायटीही स्थापन करून दिलेली नाही, असे रहिवाशांनी तक्रारीत म्‍हटले आहे. रहिवाशांनी बिल्डरकडे तक्रारी मांडल्या असता तो अर्धवट कामे पूर्ण करून तर देतच नाही, पण वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहे. धमक्या देत आहे.

म्‍हणून भोगवटाप्रमाणपत्र मिळेना !
रहिवाशांनी सिडकोकडे तक्रारी केल्यानंतर सिडकोने रहिवाशांना पत्र देऊन कळवले, की मंजूर नकाशानुसार जागेवर बांधकाम झालेले नाही. जसे बांधकाम आहे तसा नकाशाही सादर केलेला नाही. परवानगीपेक्षा जास्त बांधकाम झालेले आहे. ते बांधकाम नियमित करण्याची तरतूद नसल्याने भोगवटा प्रमाणपत्र देता नाही. ही जागा विमानतळ प्राधिकरण क्षेत्रांतर्गत असलेल्या रेड झोनमध्ये येत असल्याने या प्रकरणासाठी विमानतळ प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र देखील सादर करावे लागेल, असेही सिडकोने कळवले.

जमापुंजी स्वप्नातल्या घरासाठी लावली, नशिबी हे भोग…
आपले हक्काचे घर असावे असे प्रत्‍येकाचे स्वप्न असते. मध्यमवर्गीय असलेल्या रहिवाशांनी घरभाडे भरण्यापेक्षा स्वतःच्या घरात राहण्याचे स्वप्न घेऊन या ड्रिम कॉम्‍प्‍लेक्समध्ये फ्‍लॅट घेतले. सुरुवातीला बिल्डरने अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या. मात्र आजघडीला त्‍यांच्या नशिबी वेगळेच भोग आले आहेत.

सिडकोकडून कडक कारवाई करण्याची गरज…
या प्रकरणात सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून बिल्डरला अभय दिले जात असल्याचा आरोप आहे. सरळ सरळ अनेक गोष्टी गैरकायदेशीर असूनही बिल्डरवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software