बचतगटाच्या महिलांचे दानाचे वाण; सैनिक कल्याण निधीसाठी दिले १० हजार रुपये

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महिला बचत गटातील महिलांनी दातृत्व दाखवून देत सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान दिले आहे. सैनिक कल्याण निधीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे या महिलांनी आज, १५ जानेवारीला धनादेश सुपूर्द केला. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत कार्यरत लोक संचलित साधन केंद्राअंतर्गत काम करणाऱ्या महिला बचत गटाच्या सदस्य महिलांनी १० […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महिला बचत गटातील महिलांनी दातृत्व दाखवून देत सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान दिले आहे. सैनिक कल्याण निधीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे या महिलांनी आज, १५ जानेवारीला धनादेश सुपूर्द केला.

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत कार्यरत लोक संचलित साधन केंद्राअंतर्गत काम करणाऱ्या महिला बचत गटाच्या सदस्य महिलांनी १० हजार रुपयांचे योगदान सैनिक कल्याण निधीस दिले. प्रगती लोकसंचलित साधन केंद्र लासूर स्टेशन, सावित्रीबाई लोकसंचलित साधन केंद्र, वाळूज, तेजस्विनी लोकसंचलित साधन केंद्र, गंगापूर, एकता लोकसंचलित साधन केंद्र, पैठणच्या संलग्न बचत गटातील महिलांनी प्रत्येक केंद्रामार्फत अडीच हजार रुपये असे एकूण १० हजार रुपये धनादेशाद्वारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी या महिलांच्या दातृत्वाचे कौतुक केले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हासमन्वयक चंदनसिंग राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्रीमती सुवर्णा जाधव, महिला बालविकास अधिकारी श्रीमती रेश्मा चिमंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software