प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, हायकोर्ट एक्स्प्रेस रविवारपर्यंत अंशतः रद्द!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाडा एक्स्प्रेस १५ डिसेंबरपर्यंत नांदेड ते धर्माबाददरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. ही रेल्वे धर्माबाद-मनमाडदरम्यान धावते. हायकोर्ट एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाते. रोलिंग ब्लॉकमुळे या रेल्वेसह अन्य काही रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. हायकोर्ट एक्स्प्रेस धर्माबाद येथून पहाटे ५ वाजता निघून सकाळी १०.३० पर्यंत छत्रपती संभाजीनगरला पोहोचते. परतीच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाडा एक्स्प्रेस १५ डिसेंबरपर्यंत नांदेड ते धर्माबाददरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. ही रेल्वे धर्माबाद-मनमाडदरम्यान धावते. हायकोर्ट एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाते. रोलिंग ब्लॉकमुळे या रेल्वेसह अन्य काही रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

हायकोर्ट एक्स्प्रेस धर्माबाद येथून पहाटे ५ वाजता निघून सकाळी १०.३० पर्यंत छत्रपती संभाजीनगरला पोहोचते. परतीच्या प्रवासाला खंडपीठाचा वेळ संपल्यानंतर सायंकाळी ६ वाजता निघते. ही रेल्वे अंशतः धर्माबाद ते नांदेड आणि परतीच्या प्रवासात नांदेड ते धर्माबाद यादरम्यान रद्द करण्यात आली आहे. याशिवाय दौंड-निजामाबाद डेमू रेल्वेगाडी मुदखेड ते निजामाबाद दरम्यान १० ते १५ डिसेंबर कालावधीत रद्द केली आहे. निजामाबाद-पंढरपूर डेमू गाडी निजामाबाद- मुदखेड दरम्यान ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत रद्द असेल. परळी-पूर्णा, पूर्णा – परळी, निजामाबाद-नांदेड, नांदेड- निजामाबाद या रेल्वे १४ डिसेंबर रोजी रद्द केल्या आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software