पुन्हा निवासी डॉक्‍टरांचा संप; घाटीत रुग्णांचे हाल…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वेगवेगळ्या कारणांवरून संपावर जाण्याचे निवासी डॉक्‍टरांचे प्रमाण वाढले आहे. त्‍यामुळे घाटी रुग्णालयात दूरदूरून येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. आताही कोलकाता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रेनी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मॉर्ड संघटनेने मंगळवारपासून (१३ ऑगस्ट) बेमुदत संप पुकारला. त्‍यामुळे वरिष्ठ डॉक्‍टरांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वेगवेगळ्या कारणांवरून संपावर जाण्याचे निवासी डॉक्‍टरांचे प्रमाण वाढले आहे. त्‍यामुळे घाटी रुग्णालयात दूरदूरून येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. आताही कोलकाता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रेनी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मॉर्ड संघटनेने मंगळवारपासून (१३ ऑगस्ट) बेमुदत संप पुकारला. त्‍यामुळे वरिष्ठ डॉक्‍टरांनी धुरा सांभाळत रुग्णसेवेवर फारसा परिणाम हाेऊ दिला नाही.

बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), शस्त्रक्रिया वरिष्ठ डॉक्टरांनी केल्या. सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देईपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. रोहन गायकवाड यांनी दिला आहे. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी शासनाने त्वरित पावले उचलावी या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी सोमवारी (१२ ऑगस्ट) कँडल मार्च काढला होता व निदर्शने केली होती. घाटीतील ५३२ आणि मिनी घाटीतील ३२ डॉक्टर या संपात सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.

वारंवार रुग्णांचे हाल…
निवासी डॉक्‍टरांकडून वारंवार घाटीला वेठीस धरण्यात येत असल्याबद्दल चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे. घाटीत मराठवाड्यातून रुग्ण येत असतात. वैद्यकीय सेवा ही अन्य सेवांसारखी नाही. रुग्णांच्या जीवन-मरणाचा विषय त्‍यात येतो. असे असतानाही कर्तव्य सोडून निवासी डॉक्‍टर वारंवार संपावर जात असतात. याबद्दल मंगळवारी रुग्णांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्‍त केला. काही दिवसांपूर्वीही एका रुग्णाच्या नातेवाइकांशी झालेल्या हाणामारीवरून निवासी डॉक्‍टरांनी संप पुकारून घाटीला वेठीस धरले होते. असे प्रकार वारंवार घडत असतात. कधी त्‍यांच्या मागण्यांसाठी तर कधी छोट्या मोठ्या हाणामारीचा विषय करून निवासी डॉक्‍टर कर्तव्य सोडून वागतात. याचा फटका मात्र रुग्णांना बसतो. रुग्णसेवा काय आहे, आजवरचा या सेवेचा इतिहास काय आहे हे कुणीतरी या निवासी डॉक्‍टरांना सांगण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया मंगळवारी उमटल्या.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software