- Marathi News
- सिटी डायरी
- दुभाजक तोडणाऱ्या व्यावसायिक, पंपचालक, हॉटेलवाल्यांची खैर नाही!; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले गुन्हे दाखल क...
दुभाजक तोडणाऱ्या व्यावसायिक, पंपचालक, हॉटेलवाल्यांची खैर नाही!; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश, जिल्ह्यात ९७ ठिकाणे धोक्याची
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दुभाजक तोडणे, गतिरोधकाची उंची प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी करणे अशी बेकायदेशीर कृत्ये करणारे व्यावसायिक, पेट्रोलपंप चालक, हॉटेलचालक यांच्यावर परिवहन, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २४ जानेवारीला दिले. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दुभाजक तोडणे, गतिरोधकाची उंची प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी करणे अशी बेकायदेशीर कृत्ये करणारे व्यावसायिक, पेट्रोलपंप चालक, हॉटेलचालक यांच्यावर परिवहन, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २४ जानेवारीला दिले.
शहरात सर्वाधिक अपघात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे!
शहरात होणारे जास्तीत जास्त अपघात हे ऑटोरिक्षांमुळे व ऑटो रिक्षा अयोग्य चालवण्याच्या पद्धतीमुळे होतात. यासाठी ऑटो रिक्षा चालकांचे समुपदेशन आणि आरोग्य तपास शिबिर आयोजित करण्याचे निर्देश महापालिका आणि आरोग्य तसेच पोलीस विभागांना देण्यात आले. चालकाची अल्कोहोल तपासणी, वाहनांची तपासणी, विविध प्रसारमाध्यमातून रस्ता सुरक्षा बाबत जाणीव जागृतीपर कार्यक्रमासाठीचे आवाहन, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस, परिवहन, आरोग्य, राज्य रस्ते विकास महामंडळ या विभागामार्फत करण्यात यावे आदी सूचनाही जिल्हाधिकारी स्वामी यांनी बैठकीत दिल्या.
