दिवाळीच्या करामती… कुणाच्या हातात फुटला सुतळीबॉम्‍ब, कुणाच्या हाती भुईनळा… ३४ जण जखमी, एकाचा डोळा निकामी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : असुरक्षित पद्धतीने फटाके फोडल्यामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल होण्याची वेळ शुक्रवारी (१० ऑक्‍टोबर) आली. कुणाचा पाय, कुणाचा हात तर कुणाचा चेहरा भाजला असून, घाटीत रात्री दहापर्यंत १४ जणांवर तर चिकलठाणा येथील मिनी घाटीत दोघांवर उपचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. घाटी तिघांना भरती करण्यात आले आहे. भीमनगर येथील ११ वर्षीय मुलाचा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : असुरक्षित पद्धतीने फटाके फोडल्यामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल होण्याची वेळ शुक्रवारी (१० ऑक्‍टोबर) आली. कुणाचा पाय, कुणाचा हात तर कुणाचा चेहरा भाजला असून, घाटीत रात्री दहापर्यंत १४ जणांवर तर चिकलठाणा येथील मिनी घाटीत दोघांवर उपचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. घाटी तिघांना भरती करण्यात आले आहे.

भीमनगर येथील ११ वर्षीय मुलाचा फटाके उडवताना चेहरा भाजला. तो ५ टक्के भाजला आहे. त्याच्या पापणीला जखम झाली आहे. सुदैवाने डोळा वाचला आहे. एका आठवर्षीय मुलीचा हात भाजल्याने तिलाही घाटीत आणले होते. पहाडसिंगपुरा येथील ४३ वर्षीय महिलेला भाजलेल्या अवस्थेत घाटीत आणले होते. अनेकांनी खासगी रुग्णालयांत जाऊन उपचार घेतले. चिकलठाणा येथील मिनी घाटीत चिकलठाणा येथील एका २७ वर्षीय तरुणावर व सिडकोतील एका १३ वर्षीय मुलावर उपचार करण्यात आले. तरुणाचा हात, तर मुलाचे कपाळ भाजले गेले आहे.

बेंबडे हॉस्पिटलध्ये २० रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती प्लास्टिक सर्जन डॉ. रमाकांत बेंबडे यांनी दिली. पारदरी तांडा येथील १२ वर्षांचा मुलगा भुईनळा हातातच पेटवत होता. त्‍याचा हातात स्फोट झाल्याने हात आणि डोळा भाजला. यात त्‍याचा डोळा निकामी झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. शहरातील एका १७ वर्षांच्या मुलाने सुतळी बॉम्‍ब हातातच फोडला. त्‍यात हात भाजला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software