दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २४ ऑगस्टला

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा -2022 शनिवार दि.24ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 6 या विहित वेळेत ही परीक्षा आयोजित करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर 2 उपकेंद्रांवर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा -2022 शनिवार दि.24ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 6 या विहित वेळेत ही परीक्षा आयोजित करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर 2 उपकेंद्रांवर एकूण 624 उमेदवारांच्या परीक्षेची सोय करण्यात आली,अशी माहिती उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी दिली.

परीक्षा केंद्रांची यादी व कंसात परीक्षार्थींची संख्या याप्रमाणे :

  1. विवेकानंद कला व सरदार दिलीपसिंग वाणिज्य महाविद्यालय, समर्थ नगर (312)
  2. विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थ नगर (312)

परीक्षार्थिंसाठी सूचना

  1. परीक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
  2. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र काळ्या व निळ्या शाईचे बॉल पाँईट पेन, ओळखपत्र
    व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.
  3. उमेदवारास त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटूथ, कॅमेरा किंवा
    तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन
    जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर
    परीक्षा केंद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य
    ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य
    दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह
    त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षाकरीता बंदी घालण्यात येईल.
  4. परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही कारणास्तव अशा उमेदवारास प्रवेश देण्याचे प्राधिकार आयोगाच्या परस्पर कोणत्याही व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले नाहीत.
  5. प्रत्यक्ष परीक्षा सुरु झाल्यांनतर परीक्षा उपकेंद्राचे प्रवेशद्वार बंद करुन घेण्यात यावे.
  6. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
  7. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software