थंडीमुळे पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतरच भरवा!, शिक्षणाधिकाऱ्यांचा छत्रपती संभाजीनगरातील सर्व शाळांना आदेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थंडीचा कडाका वाढल्याने सर्व पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊनंतर भरवण्यात यावेत, असे आदेश शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) काढले आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी आणि पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनाही याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या कडाक्‍याची थंडी पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सकाळी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थंडीचा कडाका वाढल्याने सर्व पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊनंतर भरवण्यात यावेत, असे आदेश शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) काढले आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी आणि पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनाही याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

सध्या कडाक्‍याची थंडी पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सकाळी किमान तासभर उशिरा भरवण्यात यावी, अशी मागणी होत होती. सर्व व्यवस्थापनांच्या, माध्यमांच्या शाळांतील चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊनंतर भरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे पालन न केल्यास कारवाई होईल, असा इशाराही जयश्री चव्हाण यांनी दिला आहे. दरम्‍यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारपासून (८ डिसेंबर) थंडीचा कडाका वाढणार आहे. सध्या तापमानाचा पारा २० अंशावर आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software