- News
- सिटी डायरी
- जिल्ह्यात थांबवले ९५ बालविवाह!; ४ मुलींना ठेवले बालगृहात!!
जिल्ह्यात थांबवले ९५ बालविवाह!; ४ मुलींना ठेवले बालगृहात!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात आतापर्यंत ९५ बालविवाह थांबविण्यात आले असून ४ प्रकरणांमध्ये मुलींना बालगृहात ठेवण्यात आले असू उर्वरित प्रकरणात पालकांचे समुपदेशन करण्यात आले, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठकीतून समोर आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी (२५ मे)घेतला. बालकामगार, बाल विवाह, बाल भिक्षेकरी, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात आतापर्यंत ९५ बालविवाह थांबविण्यात आले असून ४ प्रकरणांमध्ये मुलींना बालगृहात ठेवण्यात आले असू उर्वरित प्रकरणात पालकांचे समुपदेशन करण्यात आले, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठकीतून समोर आली आहे.
केंद्र शासनाकडून पोस्टात मुदतठेव ठेवण्यात आली असून प्रति बालक ५५०० रुपये वयाच्या १८ व्या वर्षांनंतर जमा होतात. याशिवाय बाल न्यायनिधी अंतर्गत प्रति बालक १० हजार रुपये, बालकांची मालमत्ता हक्क संरक्षित करणे याबाबतही माहिती सादर करण्यात आली. प्रायोजकत्व योजनेअंतर्गत प्रतिबालक प्रति महिना चार हजार रुपये लाभ दिला जातो. आतापर्यंत ७१६ बालके या योजनेचा लाभ घेत आहेत. जिल्हा बालसंरक्षण कक्षाअंतर्गत जिल्ह्यात १७ बालगृहे, २ शिशुगृहे, प्रत्येकी एक निरीक्षण व एक अनुरक्षण गृह अशा एकूण २१ संस्था असून त्यात १६१७ बालकांची संगोपन व्यवस्था क्षमता आहे. तेथे ३३४ बालके सध्या प्रवेशित आहेत.

