छ. संभाजीनगरात झाला सूतकताईचा विक्रम!; JNEC च्या मैदानात एकाचवेळी २,५६५ विद्यार्थ्यांनी केली चरखा सूतकताई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी मिशन (एमजीएम) संस्थेच्या वतीने सामूहिक चरखा सूतकताई उपक्रम राबविण्यात आला. जेएनईसी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी एकाचवेळी २ हजार ५६५ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक चरखा सूतकताई करून विक्रम केला. उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याची माहिती […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी मिशन (एमजीएम) संस्थेच्या वतीने सामूहिक चरखा सूतकताई उपक्रम राबविण्यात आला. जेएनईसी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी एकाचवेळी २ हजार ५६५ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक चरखा सूतकताई करून विक्रम केला. उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी दिली.

उपक्रमाचे उद्‌घाटन इंदौर येथील आयआयटीतील प्रा. डॉ. कीर्ती त्रिवेदी, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांच्या उपस्थितीत झाले. उपक्रमात सूतकताईसाठी आठ समूहांमध्ये प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. अर्धा तास सूतकताई करण्यात आली. नाट्यशास्त्र विभागाच्या राहुल खरे यांच्या संघाने विविध भजने व गीतांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राजू सोनवणे यांनी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software