छत्रपती संभाजीनगरात ४५ वे वार्षिक पुष्पप्रदर्शन ८ व ९ फेब्रुवारी रोजी; सहभागाचे आवाहन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग उपवने व उद्याने यांच्या वतीने ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ४५ व्या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन व उद्यान स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत व प्रदर्शनात अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन सहायक संचालक जे. व्ही. चौगुले यांनी केले आहे. विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शनात गुलाबपुष्पे फुलदानातून, मोसमी फुले, बहुवार्षिय […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग उपवने व उद्याने यांच्या वतीने ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ४५ व्या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन व उद्यान स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत व प्रदर्शनात अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन सहायक संचालक जे. व्ही. चौगुले यांनी केले आहे.

विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शनात गुलाबपुष्पे फुलदानातून, मोसमी फुले, बहुवार्षिय फुले, कॅक्टस व सकुलंट, कुंड्यातील शोभीवंत झाडे, लॅण्डस्केप ऑन द स्पॉट, कलात्मक पुष्परचना, उद्यान स्पर्धा आदी विभाग आहेत. प्रत्येक विभागातील विजेत्यास एक चषक, पुष्पप्रदर्शनात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या स्पर्धकास उपवने व उद्याने विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी पुरस्कृत केलेला फिरता चषक प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेतील व सर्व गटांकरता वेगवेगळी परितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच पुष्परचना, पुष्प रांगोळी या विभागासाठीही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी सहायक संचालक जे. व्ही. चौगुले ८६९८०७०८८२, उद्यान अधीक्षक एस.टी. जाधव ९१७२५५९७९८ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software