छत्रपती संभाजीनगरात शिक्षक दिन सोहळ्यात १२८ शाळांचा गौरव; जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आई- वडील विश्वासाने मुलांना शिक्षकांकडे सोपवतात. त्या विद्यार्थ्यांना स्पर्धाक्षम, संस्कारक्षम, आरोग्यक्षम घडविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार सन्मान सोहळ्यात आज, ५ सप्‍टेंबरला जिल्ह्यातील १२८ शाळांना गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आई- वडील विश्वासाने मुलांना शिक्षकांकडे सोपवतात. त्या विद्यार्थ्यांना स्पर्धाक्षम, संस्कारक्षम, आरोग्यक्षम घडविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार सन्मान सोहळ्यात आज, ५ सप्‍टेंबरला जिल्ह्यातील १२८ शाळांना गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, अरुणा भुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना म्हणाले, की आपण विद्यार्थी, शाळा, पालक व गावासाठी काय करू शकतो असा विचार करून समाजाभिमुख काम करणे गरजेचे आहे. शाळेला गावाची मदत निश्चितच मिळते. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षक व शिक्षण आहे, असे ते म्‍हणाले.

प्रास्ताविक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी केले. आभार अरुणा भुमकर यांनी मानले. शिक्षण उपसंचालक अनिल साबळे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी अजित राजळे (शरीफपूर ), मल्हारी गोसावी (आंचलगाव ), प्रकाश राठोड (मंबापूरवाडी), बाळकृष्ण बखरे (गीरसावळी ), गणेश गव्हाणे (बनगाव), निर्मला झेंडे (चिंचखेडा), अशोक पाटील (तारूपिंपळवाडी), शिवनाथ वाडेकर (नेवपूर), सुजित फलके (गोविंदनगर) यांनी आपल्या शाळेत सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. सन्मान सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, निता श्रीश्रीमाळ, गटशिक्षणाधिकारी समाधान आराख, हेमंत उशीर, दिपाली थावरे, क्रांती धसवाडीकर, श्रीराम केदार, रंगनाथ आढाव, अनिल पवार, विलास केवट, रमेश ठाकूर, संगीता सावळे, संगीता गायकवाड, राजेश हिवाळे, प्रशांत हिवर्डे, प्रवीण लोहाडे, कृष्णा शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software