छत्रपती संभाजीनगरात डेंग्‍यू, गॅस्‍ट्रोमुळे १३ वर्षीय मुलीचा मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : डेंग्यू आणि गॅस्ट्रो झाल्याने १३ वर्षीय मुलीचा सोमवारी (१५ जुलै) रात्री साडेअकराला मृत्यू झाला. झारा मोहम्मद अब्दुल हादी (रा. रोशनगेट) असे मुलीचे नाव आहे. उलट्या, जुलाब आणि तापामुळे झारावर शहरातील सहारा रुग्णालयात उपचार सुरू होते. ७ जुलैपासून तिला त्रास होता, सोमवारी ११ तासांत तिची प्रकृती अत्‍यंत खालावली आणि प्राणज्‍योत मालवली. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : डेंग्यू आणि गॅस्ट्रो झाल्याने १३ वर्षीय मुलीचा सोमवारी (१५ जुलै) रात्री साडेअकराला मृत्यू झाला. झारा मोहम्मद अब्दुल हादी (रा. रोशनगेट) असे मुलीचे नाव आहे. उलट्या, जुलाब आणि तापामुळे झारावर शहरातील सहारा रुग्णालयात उपचार सुरू होते. ७ जुलैपासून तिला त्रास होता, सोमवारी ११ तासांत तिची प्रकृती अत्‍यंत खालावली आणि प्राणज्‍योत मालवली.

रोशनगेट येथील बालरोगतज्‍ज्ञ डॉ. मोहम्मद अब्दुल हादी यांची झारा ही कन्या आहेत. तिची आई डॉ. अतिया हादी या स्त्रीरोगतज्‍ज्ञ आहेत. सकाळी पोटदुखी आणि जुलाब झाल्यामुळे झारा एकदम गळून गेली होती. सायंकाळी तिचा बीपी कमी होत गेला. चिकनगुण्यामुळे सांधे दुखत होते. दोन दिवसांपासून तिला किरकोळ पोटदुखीही होती. रुग्णालयात दाखल केल्यावर डेंग्‍यूची प्राथमिक चाचणी केली होती. डेंग्‍यूची तपासणी पॉझिटिव्‍ह आली, त्‍यात गॅस्ट्रो झाल्याने झाराचा मृत्‍यू झाला, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जानेवारी ते जुलैदरम्‍यान शहरात डेंग्‍यूचे १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, गॅस्‍ट्रोचे ५३ रुग्ण समोर आले आहेत, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software