छत्रपती संभाजीनगरात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत उत्साहाला उधाण!; रांजणगाव शेणपुंजीत विसर्जनादरम्यान तरुणाचा तलावात बुडून मृत्‍यू

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (टीम सीएससीएनकडून) : ढोल-ताशांचा दणदणाट, पथकांचे बहारदार सादरीकरण अन्‌ फटाक्यांची विलोभनीय आतषबाजी… अशा जल्लोषात लाडक्या गणरायाला छत्रपती संभाजीनगरकरांनी निरोप दिला. मध्यरात्री १२ नंतरही विसर्जन मिरवणूक सुरू होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे आर्जव जडअंतकरणाने शहरवासियांनी बाप्पाची मूर्ती तलाव, विहिरीत विसर्जित केली. ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीची सकाळी अकराला झाली. त्यानंतर मुख्य […]

छत्रपती संभाजीनगर (टीम सीएससीएनकडून) : ढोल-ताशांचा दणदणाट, पथकांचे बहारदार सादरीकरण अन्‌ फटाक्यांची विलोभनीय आतषबाजी… अशा जल्लोषात लाडक्या गणरायाला छत्रपती संभाजीनगरकरांनी निरोप दिला. मध्यरात्री १२ नंतरही विसर्जन मिरवणूक सुरू होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे आर्जव जडअंतकरणाने शहरवासियांनी बाप्पाची मूर्ती तलाव, विहिरीत विसर्जित केली.

ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीची सकाळी अकराला झाली. त्यानंतर मुख्य विसर्जन मिरवणूक सुरू झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते चंदक्रांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, खासदार कल्याण काळे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची उपस्थिती होती. वेगवेगळ्या भागांतील मंडळांचे गणपती मिरवणुकीत सहभाग होत गेले, तसा उत्साह वाढतच गेला. महिला, तरुणींचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. युवतींची ढोल पथके, पावली नृत्यांनी मिरवणुकीची रंगत वाढवली. मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी राजकीय पक्ष, संघटनांनी व्यासपीठ उभारले होते. शहर पोलिसांनीही गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

मिरवणुकीचे आकर्षण….
महाकाल क्रीडा मंडळाचे ढोल पथक व झांज पथक, दिवाण देवडी येथील पावन गणेश मंडळाने केलेली आतषबाजी, धावणी मोहल्ला येथील बाल कन्हैया गणेश मंडळाची भव्य गणेशमूर्ती आणि याच मंडळाने इंदौरहून आणलेले बँडपथक, जाधवमंडी येथील श्री जबरे हनुमान मंडळाने दाखवलेले तालीमीचे कसब व कयावती, पदमपुरा येथील केसरीचा राजाची भव्य गणेशमूर्ती मिरवणुकीचे आकर्षण ठरले. गुलमंडीवर तनवाणी मित्रमंडळातर्फे धपाटे, भाजी, चटणीचा बेत होता.

गणेश विसर्जन करताना तरुणाचा तलावात बुडून मृत्‍यू
घाणेगाव पाझर तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करताना २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अभय सुधाकर गावंडे (वय २१, रा. नर्सरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. अभयचे वडील सुधाकर गावंडे खासगी कंपनीत कामगार आहेत. तिघा मित्रांसह अभय गणेश विसर्जन करण्यासाठी लगतच्या घाणेगाव पाझर तलावाकडे गेला होता. अभयला खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तोल जाऊन पाण्यात पडला अन्‌ बुडाला. सोबतच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर काही तरुण धावून आले. मात्र अभयला ते वाचवू शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अभयचा मृतदेह बाहेर काढला. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अभयने मृती हातात घेऊन मित्रांसोबत फोटोही काढले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software