छत्रपती संभाजीनगरला भूकंपाचे सौम्य धक्के!; भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आज, १० जुलैला सकाळी ०७:१५ वा. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी, पिसादेवी, कांचनवाडीसह इतरही काही भागांसह जिल्ह्यातील घारेगाव, एकतुनी, फारोळा, पांढरी पिंपळगाव, पिंप्री राजा, आडगाव खुर्द, पाचोड, विहामांडवा येथे भूकंपाचे सौम्य धक्‍के जाणवले. हिंगोली येथील संत नामदेवनगर हिंगोली येथे भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आज, १० जुलैला सकाळी ०७:१५ वा. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी, पिसादेवी, कांचनवाडीसह इतरही काही भागांसह जिल्ह्यातील घारेगाव, एकतुनी, फारोळा, पांढरी पिंपळगाव, पिंप्री राजा, आडगाव खुर्द, पाचोड, विहामांडवा येथे भूकंपाचे सौम्य धक्‍के जाणवले. हिंगोली येथील संत नामदेवनगर हिंगोली येथे भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगरपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

फॅन अचानक बंद पडल्यानंतरच्या सारखे होते, असे काही नागरिकांनी सांगितले. भूकंपाचे धक्के जाणवताच हिंगोली शहरातील नागरिकांनी घाबरून घरातून बाहेर रस्त्यावर धावपळ सुरू केली. हिंगोली किंवा मराठवाडाभर कुठेही मोठे नुकसान झालेले नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांना केले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यात काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले असल्याचे आमचे जालन्याचे विशेष प्रतिनिधी अरविंद देशमुख यांनी कळवले.

दरम्‍यान, विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सौम्य स्वरुपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित वा वित्तहानी झाली नाही, अशी माहिती दिली. शासनाने भूकंपाची गंभीर नोंद घेतली असून, संबंधित जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे व नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्‍ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भूकंप व नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे श्री. पवार यांनी विधानसभेत सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software