३० तासांच्या शटडाऊनमुळे अर्ध्या शहरात पाण्याचा ठणठणाट!, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिकेने काल, २० मार्चपासून पाणीपुरवठ्यात तब्बल ३० तासांचा शटडाऊन घेतला आहे. गुरुवारी सकाळी काही भागांना पाणीपुरवठा केल्यानंतर जुन्या शहरातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्‍यामुळे अर्ध्याहून अधिक शहरात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. सिडको एन-६, हडको भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्स्प्रेस जलवाहिनीचा पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा एक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिकेने काल, २० मार्चपासून पाणीपुरवठ्यात तब्बल ३० तासांचा शटडाऊन घेतला आहे. गुरुवारी सकाळी काही भागांना पाणीपुरवठा केल्यानंतर जुन्या शहरातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्‍यामुळे अर्ध्याहून अधिक शहरात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे.

सिडको एन-६, हडको भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्स्प्रेस जलवाहिनीचा पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा एक पंप सुरू ठेवण्यात आला आहे. सातशे आणि नऊशेची योजनादेखील सुरू आहे. नक्षत्रवाडी येथील एमबीआरमध्ये पाणी घेतले जात असून तेथूनच एक्स्प्रेस जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

कशासाठी घेतला शटडाऊन…
गेल्या आठवड्यात रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली तिरुपती सोसायटीजवळ नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गंत ११०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत असताना कंपनीकडून मनपाच्या १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागला. त्यामुळे थोडे लिकेज झाले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पाहणी करून दुरुस्तीसाठी ३० तासांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी सकाळी अकरालाच शहराचा पाणीपुरवठा जायकवाडी धरणातून बंद करण्यात आला. त्यानंतर रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखालील दुरुस्तीचे काम सुरू झाले. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर एमबीआरमध्ये, फारोळा, जायकवाडी आणि अन्य ठिकाणी लहान-मोठ्या लिकेजची, विद्युत विभागाची दुरुस्ती करण्यात येत आहे. कामे शुक्रवारी सायंकाळपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर जायकवाडीहून शहरात पाणी आणले जाईल. शुक्रवारी रात्री सर्व जलकुंभ भरून घेऊन शनिवारी सकाळपासून शहराला पाणीपुरवठ्याचे काम केले जाण्याची शक्‍यता आहे. ज्‍या वसाहतींना गुरुवार, शुक्रवारी पाणी येणार होते, त्‍यांना थेट शनिवारी पाणी मिळेल. शनिवारनंतरचे सर्व पाण्याचे टप्पे दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात येणार आहे.

या भागात पाणीपुरवठा विस्कळीत
क्रांती चौक, जिन्सी, शहागंज, कोटला कॉलनी, वेदांतनगर, ज्युबिली पार्क, हनुमान टेकडी, शहागंज या जलकुंभांचा पुरवठा बंद राहणार आहे. या जलकुंभातून पाणीपुरवठा होणाऱ्या रेल्वेस्टेशन, बन्सीलालनगर, कोकणवाडी, गुरुगोविंदसिंगपुरा, उल्कानगरी, बेगमपुरा-पहाडसिंगपुरा, जयसिंगपुरा, विद्यापीठ, समर्थनगर, कोतवालपुरा, गरमपाणी, सिल्क मिल कॉलनी, घाटी रुग्णालय, नंदनवन कॉलनी, भीमनगर-भावसिंगपुरा, ज्युबिली पार्क, भडकल गेट, जयभीमनगर, सिल्लेखाना, कोटला कॉलनी, विभागीय क्रीडा संकुल, जवाहरनगर, विश्वभारती कॉलनी, लेबर कॉलनी, सिंधी कॉलनी, बालाजीनगर, रवींद्रनगर, क्रांतीनगर, शहानूरवाडी, मयूरनगर, सहकार कॉलनी, संभाजीपेठ, गुलमंडी, सिटी चौक, बुढीलेनचा काही भाग, शहागंज या भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software