चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाच्या हालचाली गतिमान!; जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन दिले ‘हे’ आदेश…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाणा येथील छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणाचे काम वेळेत मार्गी लावण्यासाठी भूसंपादनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी मंगळवारी (१६ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. खासदार डॉ. भागवत कराड, अप्पर जिल्हाधिकारी तेजुसिंग पवार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे, उपविभागीय अधिकारी व्यंकट […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाणा येथील छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणाचे काम वेळेत मार्गी लावण्यासाठी भूसंपादनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी मंगळवारी (१६ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. खासदार डॉ. भागवत कराड, अप्पर जिल्हाधिकारी तेजुसिंग पवार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, विमानतळ प्राधिकरण व्यवस्थापक शरद येवले, सिडको प्रशासक जी. आर. साटोटे, विधी अधिकारी ॲड. उषा वायाळ, प्रादेशिक अधिकारी (एमआयडीसी) चेतन गिरासे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ. विजय वीर, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, रेल्वेचे जनार्दन बालमूच, महावितरणचे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

बैठकीत काय चर्चा झाली…
विमानतळ विस्तारीकरणाच्या अनुषंगाने रेल्वे अंडरपासची आवश्यकता नाही, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विस्तारीकरणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत १५ मीटर रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही करण्यात यावी. भूसंपादनाची कार्यवाही महाराष्ट्र शासनाने करावी व भूसंपादन अधिकारी विशेष घटक यांनी निधी मागणीचा प्रस्ताव द्यावा. प्रस्तावित भूसंपादन क्षेत्रात येणाऱ्या सिडकोची घरे व अन्य मालमत्तांसंदर्भात शासकीय नियमानुसार कार्यवाही व्हावी. संपादन संस्थेने भूसंपादनासाठी शासन निर्णयानुसार आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, 0असेही बैठकीत ठरविण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software