- News
- सिटी डायरी
- घाटीतील निवासी डॉक्टरांनी क्रूरतेचा कळस गाठला; मागण्या मान्य करून घेण्याच्या हट्टासाठी रुग्णांच्या
घाटीतील निवासी डॉक्टरांनी क्रूरतेचा कळस गाठला; मागण्या मान्य करून घेण्याच्या हट्टासाठी रुग्णांच्या जिवाशी खेळताहेत खेळ!; कर्तव्य विसरल्याने रुग्णांकडून संताप
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : डॉक्टर या शब्दाचा अर्थ बदलून टाकण्याचा प्रयत्न सध्या घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी चालवला आहे. मागण्या मान्य करून घेण्याच्या हट्टासाठी पेटून उठत निवासी डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशीही संप चालूच ठेवल्याने रुग्णांचे हाल होत असून, एकप्रकारे रुग्णांच्या जिवाशीच खेळले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यात सरकारने हस्तक्षेप करून निवासी डॉक्टरांवर आता कारवाई […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : डॉक्टर या शब्दाचा अर्थ बदलून टाकण्याचा प्रयत्न सध्या घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी चालवला आहे. मागण्या मान्य करून घेण्याच्या हट्टासाठी पेटून उठत निवासी डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशीही संप चालूच ठेवल्याने रुग्णांचे हाल होत असून, एकप्रकारे रुग्णांच्या जिवाशीच खेळले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यात सरकारने हस्तक्षेप करून निवासी डॉक्टरांवर आता कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. निवासी डॉक्टरांनी क्रूरतेचा कळस गाठला असून, ते कर्तव्य विसरल्याचा संताप रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक व्यक्त करत आहेत.
कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा निषेध आणि सुरक्षेच्या दृष्टीने मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. मेडिकल प्रोटेक्शन ॲक्टला लवकरात लवकर मंजुरी मिळावी. घाटीतील सुरक्षारक्षकांत वाढ करावी, अशी मागणी मार्डचे अध्यक्ष डॉ. रोहन गायकवाड यांनी केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

