काळजी घ्या, छ. संभाजीनगरात डेंग्‍यूचे रुग्ण वाढताहेत झपाट्याने, ४ रुग्णांसह २४ संशयित रुग्णांवर उपचार सुरू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेच्या उपमुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी सांगितले की, सध्या चार रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण बेगमपुरा, पदमपुरा, रोशनगेट या परिसरातील आहेत. २४ संशयित रुग्णदेखील आहेत. सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहे. खासगी रुग्णालयांना रुग्णांची माहिती रोज […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेच्या उपमुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी सांगितले की, सध्या चार रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण बेगमपुरा, पदमपुरा, रोशनगेट या परिसरातील आहेत. २४ संशयित रुग्णदेखील आहेत. सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहे. खासगी रुग्णालयांना रुग्णांची माहिती रोज महापालिकेला कळविणे बंधनकारक करण्यात आले.

रुग्ण आढळलेल्या पदमपुरा, बेगमपुरा, रोशनगेट भागात महापालिकेने सर्वेक्षणही सुरू केले आहे. शहरात सध्या सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालयांत सकाळी, संध्याकाळी रुग्णांची गर्दी वाढली आहे. गेल्या आठवड्यात रोशनगेट येथील १३ वर्षीय मुलीचा, आरेफ कॉलनी येथील १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका अलर्ट मोडवर आली आहे.

दाट लोकसंख्या असलेल्या वसाहतींमध्ये सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जात आहेत. काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील एनआयव्ही लॅबकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. डेंग्यू होऊ नये म्हणून नागरिकांनी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा. कुठेही पाणी साचू देऊ नये. ताप आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. विशेषतः लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. अर्चना राणे यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software