- News
- सिटी डायरी
- ओहरगाव प्रकरणात पालकमंत्री सत्तारांवर गंभीर आरोप; आरोपींना बळ देत असल्याचा संशय, नरेंद्र पाटील थेटच
ओहरगाव प्रकरणात पालकमंत्री सत्तारांवर गंभीर आरोप; आरोपींना बळ देत असल्याचा संशय, नरेंद्र पाटील थेटच म्हणाले, हा धर्म-समाजाचा नाहीतर मुलींच्या रक्षणाचा विषय!, आरोपींना पाठिशी घालू नका, पूजाला न्याय द्या!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नराधम कासीम यासीन पठाण (वय २१, रा. ओव्हरगाव) याने लव्ह जिहादच्या मानसिकतेतून छळाचा कळस गाठल्याने १७ वर्षीय पूजा शिवराज पवार (ओव्हरगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) हिने येथे घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पालकमंत्री अब्दुल सत्तार हे आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नराधम कासीम यासीन पठाण (वय २१, रा. ओव्हरगाव) याने लव्ह जिहादच्या मानसिकतेतून छळाचा कळस गाठल्याने १७ वर्षीय पूजा शिवराज पवार (ओव्हरगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) हिने येथे घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पालकमंत्री अब्दुल सत्तार हे आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला असून, हा विषय समाजाचा किंवा धर्माचा नाहीतर मुलींच्या रक्षणाचा असल्याने सत्तार यांनी आरोपींसाठी प्रयत्न करण्याऐवजी, पूजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

पूजाचे स्वप्न डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी ती नीटची तयारी करत होती. कासीमने बरोबर तिला हेरले. त्याने तिला लव्ह जिहाद जाळ्यात अडकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र शेतकरी कुटुंबातील पूजाचे संस्कार आड आले. ती त्याच्या जाळ्यात अडकली नाही. त्यामुळे संताप अनावर झालेल्या कासीमने तिच्या हालचालींवर नजर ठेवण्यापासून मोबाइलवर कॉल करून त्रास देण्यापर्यंत, तिला गाठून प्रेम कर नाहीतर तुझ्या कुटुंबीयांना ठार मारेल, अशा धमक्या द्यायला सुरुवात केल्याने पूजा हादरून गेली होती. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाचे काही बरेवाईट होऊ शकते, ही भीती तिच्या मनात बसली. यातूनच तिने स्वतः प्राणत्याग केला. या प्रकरणात पूजाचे वडील शिवराज साहेबराव पवार (वय ४०) रा. ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुख्य आरोपी कासीम यासीन पठाण (वय २१) व त्याच्या यासीन सुभान पठाण, गफ्फार सुभान पठाण, जब्बार गफ्फार पठाण, राजू यासीन पठाण, ईरफान हारुण पठाण, हारुण सुभान पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

