वाळूज, वैजापूरमध्ये अपघाताच्या घटना : दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील भटाणा गावाजवळ आणि छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज येथे झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. कुमार भीमसिंग देवरे (वय ४०, रा. मध्य प्रदेश) व पुंडलिक दगडू अहिरे (वय ५६, रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

जातेगाव (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील शुभम नामदेव भागवत (वय ३५) मंगळवारी (१८ नोव्‍हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास शिऊर बंगल्याकडून नांदगावकडे दुचाकीने भरधाव जात होता. भटाना गावाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या मजुरांच्या दुचाकीला तो धडकला. यात मजूर कुमार देवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा नीलेश कुमार देवरे (वय १८) आणि शुभम गंभीर जखमी झाले.  दोघांवर वैजापूच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज येथे सोमवारी (१७ नोव्‍हेंबर) रात्री ११ च्या सुमारास ट्रकच्या धडकेने पुंडलिक अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला. ते ओएसिस चौकातील सारस्वत बँकेत सिक्युरिटी गार्ड होते. नेहमीप्रमाणे रात्री ड्युटीसाठी दुचाकीने जात वाळूजमध्येच त्यांना ट्रकने धडक दिली. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. ट्रकमध्ये कापूस होता. ट्रकचालक नितीन दशरथ डरफे (वय ३६, रा. इरगाव, ता. गेवराई, जि. बीड) हा दारूच्या नशेत वाहन चालवत होता. शुभम पुंडलिक अहिरे (वय २५) यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software