विद्यापीठातील विहिरीत मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ!; छत्रपती संभाजीनगरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोरील अर्ध्या बुजलेल्या विहिरीत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (२ नोव्‍हेंबर) मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी दुर्गंधीमुळे सुरक्षारक्षकांना सांगितले. यानंतर ही बाब समोर आली. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

विहिरीतून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी सुरक्षारक्षकांना कळवले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहिले असता विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी लगेचच बेगमपुरा पोलीस आणि अग्‍निशमन विभागाला कळवले. उप अग्निशमन अधिकारी विजय राठोड, ड्यूटी ऑफिसर दीपराज गंगावणे, जवान संग्राम मोरे, प्रसाद शिंदे, प्रणाल सूर्यवंशी, मनसुब सपकाळ, विक्रांत बकले, लव घुगे यांनी विद्यापीठात येत मृतदेह बाहेर काढला. बेगमपुरा पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत, असे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले. मृतदेहाची अवस्था वाईट असल्याने त्याचे वय किती, तो कोण आहे, विहिरीत पडला, पाडला की आत्‍महत्‍या केली, हे तपासाअंतीच समोर येणार आहे.  दोन दिवसांपूर्वी मृत्‍यू झाल्याचा अंदाज आहे. घातपाताची शक्यता जास्त आहे. कारण कुणाकडे सामान्यतः पाकीट, मोबाइल, ओळखपत्र किंवा काहीतरी खिशात आढळतेच. पण मृतदेहाच्या कपड्यात काहीच आढळले नाही. विहिरीजवळही दुचाकी किंवा मोबाइल आढळला नाही. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software