SHOCKING : छ. संभाजीनगरमध्ये जिममध्ये अचानक चक्कर येऊन कोसळली २० वर्षीय तरुणी, हार्टॲटॅकने मृत्‍यू!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जीममध्ये व्यायाम केल्यानंतर अचानक चक्कर येऊन तरुणीचा हार्टॲटॅकने मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड बायपास भागात शुक्रवारी (१२ सप्‍टेंबर) सकाळी समोर आली आहे. प्रियांका अनिल खरात (वय २०, रा. म्हस्के पेट्रोलपंपाशेजारी, बीड बायपास) असे मृत्‍यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

प्रियांका बी. फार्मसी पदवीधर आहे. महिनाभरापासून भाऊ व मैत्रिणीसह जीमला जात होती. गुरुवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी प्रियांकाची आई कामानिमित्त बाहेर गेलेली होती. त्यामुळे प्रियंकानेच वडिलांना चहा करून दिला. बाबा मी जीमला जाऊन लवकर येते, असे म्हणून ती भाऊ यश व मैत्रीण प्रणाली कुलकर्णीसोबत जीमला गेली. जीममध्ये प्रियांकाने हसत खेळत व्यायाम केला. व्यायामानंतर अचानक तिला चक्कर आली व कोसळली.

तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हार्टॲटॅक येऊन तिचा मृत्यू झाला. प्रियांकाचे वडील अनिल खरात हे कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. प्रियांका कुटुंबातली मोठी मुलगी होती. तिच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ आहे. सायंकाळी तिच्यावर गादिया विहार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बहिणीच्या आकस्मिक निधनाने यशला मोठा धक्का बसला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software