कर्णपुरा यात्रेत तृतीयपंथीयांत राडा, १ गंभीर जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : कर्णपुरा यात्रेत तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यात धारदार वस्तूने एका तृतीयपंथीयाच्या पाठीत वार करण्यात आल्याने ती जखमी झाली आहे. पोलिसांनी ४ तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (२९ सप्टेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

विलास किसन शिंदे ऊर्फ लाली जोगती (वय ३०, रा. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर) असे गंभीर जखमीचे ना आहे. त्याने छावणी पोलीस ठाण्यात प्रकरणात तक्रार दिली आहे. तो सोमवारी (२९ सप्टेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास स्वाती सुहाना शेख, सोनी शेख, निकीता त्रिभुवन, सागर अशोक क्षीरसागर उर्फ खुशबू असे कर्णपुरा येथे देवीचे दर्शन करून हनुमान मंदाराजवळ आले.

त्यावेळेस गुड्डी ऊर्फ स्वप्निल पोटपिल्लेवार हिने स्वातीच्या तोंडात चापट मारली. त्यावेळेस विलासने तिला का मारहाण करतेस, असे विचारले. त्यावर गुड्डीने तिच्या हातातील काही तरी धारदार वस्तूने विलासच्या पाठीवर मारले. त्यामुळे विलास गंभीर जखमी झाला. गौरी, नैना, मन्नत यांनी शिवीगाळ करून विलासचे केस धरून हाताचापटाने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार प्रकाश बावस्कर करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software