- News
- सिटी क्राईम
- अरेरे काय हेऽऽ... भररस्त्यात दारू पिऊन २ महिलांची फ्री स्टाइल हाणामारी!; मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ...
अरेरे काय हेऽऽ... भररस्त्यात दारू पिऊन २ महिलांची फ्री स्टाइल हाणामारी!; मोंढा नाका उड्डाणपुलाजवळील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भररस्त्यात दारू पिऊन २ महिलांनी धिंगाणा घालत आपसात जोरदार हाणामारी सुरू केली. पोलिसांनी घटनास्थळी येत दोघींना ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना जालना रोडवरील मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ गुरुवारी (११ सप्टेंबर) मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. आरती प्रकाश कांबळे (वय ३०, रा. उस्मानपुरा, पीरबाजारजवळ) व प्रतीक्षा बाळासाहेब भादवे (वय २५, रा.उस्मानपुरा, पीरबाजारजवळ) अशी दोघींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
टीव्ही सेंटर भागात सध्या आनंदनगरी सुरू असून, बुधवारी (१० सप्टेंबर) रात्री ९ च्या सुमारास या ठिकाणी काही महिलांतदेखील तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही. याशिवाय जालना रोडवरील मुकुंदवाडी चौकाच्या समोरच्या बाजूवर दोन दारूड्यांनीही रस्त्यावरच लोटांगण घेतल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. हा प्रकार गुरुवारी (११ सप्टेंबर) रात्री ९ च्या सुमारास घडला. सिडको एमआयडीसी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली. याही घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

