MGM च्या इमारतीवर सोलार पॅनल साफ करताना बापलेक कोसळले, पित्‍याचा मृत्‍यू, मुलगा गंभीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एमजीएममध्ये बुधवारी १८ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारा इमारतीवरील सोलार पॅनलची साफसफाई करताना चौथ्या मजल्यावरून कामगार बाप-लेक कोसळले. यात गंभीर जखमी होऊन पित्‍याचा मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्‍याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. अजय सोमीनाथ गायकवाड (वय ५०, रा. भानुदासनगर, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एमजीएममध्ये बुधवारी १८ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारा इमारतीवरील सोलार पॅनलची साफसफाई करताना चौथ्या मजल्यावरून कामगार बाप-लेक कोसळले. यात गंभीर जखमी होऊन पित्‍याचा मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्‍याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

अजय सोमीनाथ गायकवाड (वय ५०, रा. भानुदासनगर, आकाशवाणी) असे मृत्‍यू झालेल्या पित्‍याचे तर शरद अजय गाकवाड (वय १८) असे जखमी मुलाचे नाव आहे. एमजीएममध्ये कंत्राटी कर्मचारी असलेले अजय गायकवाड त्‍यांच्या मुलासोबत एमजीएममधील एका इमारतीवरील सोलार पॅनलची साफसफाई करत होते. सोलार पॅनलच्या पायरीवरून पाय घसरून दोघे बापलेक कोसळले. अजय यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते मृत्‍यूमुखी पडले. दोघा बापलेकाला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी अजय यांना तपासून मृत घोषित केले. मुलगा शरद जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सिडको पोलिसांनी घेतली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार भालेराव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software