LOVE STROY ते आत्‍मघात स्टोरी…. वेळीच पोलीस धावले म्हणून वाचली १२ वीत शिकणारी तरुणी!, वाळूज MIDC तील घटना, प्रियकराच्या हट्टाला वैतागून उचलणार होती टोकाचे पाऊल!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आजच्या तरुण पिढीने प्रेमाचा अर्थच बदलून टाकला आहे. शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून बसल्याने त्‍यातून निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे थेट प्राणत्‍यागासारखे टोकाचे पाऊल उचलण्यासही ही पिढी मागेपुढे पाहत नाही… मंगळवारी (२२ ऑक्‍टोबर) वाळूज औद्योगिक वसाहत परिसरात असाच प्रकार समोर आला. प्रियकराच्या हट्टाला नकार दिल्यानंतर तो अधिकच आग्रही झाल्याने आणि या गोष्टीची चर्चा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आजच्या तरुण पिढीने प्रेमाचा अर्थच बदलून टाकला आहे. शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून बसल्याने त्‍यातून निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे थेट प्राणत्‍यागासारखे टोकाचे पाऊल उचलण्यासही ही पिढी मागेपुढे पाहत नाही… मंगळवारी (२२ ऑक्‍टोबर) वाळूज औद्योगिक वसाहत परिसरात असाच प्रकार समोर आला. प्रियकराच्या हट्टाला नकार दिल्यानंतर तो अधिकच आग्रही झाल्याने आणि या गोष्टीची चर्चा मित्र-मैत्रिणींत झाल्याने तरुणीने एका मैत्रिणीला सांगून आत्‍महत्‍येसाठी थेट तलावाकडे धाव घेतली. तिच्या मैत्रिणीने प्रसंगावधान राखून तातडीने डायल ११२ ला कॉल केल्याने वेळीच पोलिसांनी धावून तरुणीला वाचवले…. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तरुणीला वाचवल्यानंतर तिचे समुपदेशन केले. त्यानंतर तिने चूक झाल्याची कबुली दिली आणि जीव वाचवल्याबद्दल पोलिसांना थँक्‍यूही म्हणाली.

नक्की काय झाले?
वाळूज येथील कीर्ती (नाव बदलले आहे) बारावीत शिकते. तिची अंकितसोबत (नाव बदलले आहे) ओळख, मैत्री आणि नंतर प्रेम झाले. प्रेमात दोघे आकंठ बुडाल्यानंतर त्‍याने तिच्याकडे एकांतात भेटण्यासाठी आग्रह सुरू केला. तिने त्‍याला समजावून सांगितले. पण तो न ऐकता अधिकच हट्टाला पेटला. त्‍याच्या वागण्याचा तिला त्रास होऊ लागला. याची चर्चा मित्र-मैत्रिणींत झाली. त्‍यामुळे ती टेंशनमध्ये आली.

मंगळवारी (२२ ऑक्‍टोबर) दुपारी दोनला तलावात आत्‍महत्‍या करायला जाते, असे मैत्रीण काया (नाव बदलले आहे) हिला सांगून ती थेट तलावाच्या दिशेने गेली. त्‍यामुळे घाबरून गेलेल्या कायाने डायल ११२ ला कॉल केला. पोलीस अंमलदार मंगेश जाधव, कल्याण खामकर यांनी तातडीने धाव घेतली. तलावाकडे निघालेल्या कीर्तीला रोखून तिची समजूत काढली. तिला पोलीस ठाण्यात आणले. पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे यांनी कीर्तीचे समुपदेशन करत तिचे मत परिवर्तन केले. त्‍यामुळे कीर्तीलाही चुकीची जाणीव होऊन तिने माफी माग प्राण वाचविल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले. यानंतर तिला घरी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software