५० हजारांची लाच घेतली; पोलीस निरीक्षक राजेश यादव, अंमलदार सुरेश पवारवर ACB ची कारवाई, छत्रपती संभाजीनगरात खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात पोलीस निरीक्षक राजेश सुदाम यादव (वय ४५) आणि पोलीस अंमलदार सुरेशबाबू सिंग पवार शुक्रवारी (३० ऑगस्ट) अडकले. पुंडलिकनगर ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण…३८ वर्षीय व्यक्‍तीची गारखेडा परिसरात २४ हजार स्क्वेअर फूट जागा आहे. या जागेचा वाद सध्या न्यायालयात सुरू […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात पोलीस निरीक्षक राजेश सुदाम यादव (वय ४५) आणि पोलीस अंमलदार सुरेशबाबू सिंग पवार शुक्रवारी (३० ऑगस्ट) अडकले. पुंडलिकनगर ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण…
३८ वर्षीय व्यक्‍तीची गारखेडा परिसरात २४ हजार स्क्वेअर फूट जागा आहे. या जागेचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी या व्यक्तीने पुंडलिकनगर पोलिसांकडे बंदोबस्त मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलीस निरीक्षक व अंमलदाराने या कामासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. आधी ५० हजार आणि अतिक्रमण काढल्यानंतर जागेचा ताबा मिळाल्यावर उर्वरित १ लाख देण्याचे ठरले.

लाचेचा पहिला टप्पा ५० हजार रुपये ३ एप्रिलला पवार याने घेतले. मात्र अतिक्रमण न काढल्यामुळे जागामालक व्यक्‍तीने पोलीस निरीक्षक राजेश यादव, अंमलदार सुरेश पवार यांची भेट घेतली तेव्हा दोन टप्प्यांत पैसे परत देतो, असे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण करून जागामालक व्यक्‍तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून शुक्रवारी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राजीव तळेकर यांनी केली. अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software