२१ वर्षीय तरुणाची छातीत चाकू खुपसून निर्घृण हत्‍या!; २४ तासांतच दुसरा खून घडल्याने शहर हादरले!!; तरुणीच्या छेडछाडीवरून होती धुसफूस

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अवघ्या २४ तासांत शहरात आणखी एक खुनाची घटना घडल्याने शहर हादरले आहे. १८ वर्षीय नशेखोराने क्रूरपणे २१ वर्षीय तरुणाची छातीत चाकू खुपसून निर्घृण हत्‍या केली. ही थरारक घटना विश्रांतीनगरमध्ये बुधवारी (१६ ऑक्‍टोबर) दुपारी १२ वाजता घडली. हत्‍येला जुन्या वादाची किनार आहे. अमोल ऊर्फ नंदू दाभाडे (वय २१, विश्रांतीनगर) असे हत्‍या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अवघ्या २४ तासांत शहरात आणखी एक खुनाची घटना घडल्याने शहर हादरले आहे. १८ वर्षीय नशेखोराने क्रूरपणे २१ वर्षीय तरुणाची छातीत चाकू खुपसून निर्घृण हत्‍या केली. ही थरारक घटना विश्रांतीनगरमध्ये बुधवारी (१६ ऑक्‍टोबर) दुपारी १२ वाजता घडली. हत्‍येला जुन्या वादाची किनार आहे.

अमोल ऊर्फ नंदू दाभाडे (वय २१, विश्रांतीनगर) असे हत्‍या झालेल्या तरुणाचे नाव असून, मारेकऱ्याचे नाव नीलेश सुभाष चव्हाण (वय १८) आहे. नीलेशसह त्‍याच्या कुणाल नावाच्या साथीदाराविरुद्ध पुंडलिकनगर पोलिसांनी हत्‍येचा गुन्हा दाखल केला आहे. अमोलचे वडील मजुरीकाम करतात. अमोल पेंटर असून प्लंबिंगचीही कामे करताे. बुधवारी दुपारी १२ वाजता घराजवळील हनुमान मंदिराच्या ओट्यावर तीन मित्रांसह अमोल गप्पा मारत होता.

मोबाइलमध्ये गुंग असतानाच नीलेश हा कुणाल नावाच्या मित्रासह तिथे गेला. आमच्यासोबत चल असे नीलेशने अमोलला सांगितले. त्याने नकार दिला तरी दोन्ही हातांनी पकडून तो त्याला ओढत नेऊ लागला. तो जागेचा हलत नसल्याचे पाहून तिथेच छोटा चाकू त्याच्या छातीत खुपसून बाहेर काढला. चाकू खोलवर लागल्याने अमोल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मित्रांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

खुनी चक्क घरात करत होता आराम, म्हणाला, मला काही आठवत नाही…
विश्रांतीनगर खून झाल्याचे कळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, विनोद भालेराव, सहायक फौजदार सुनील म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने नीलेशच्या घरी धडक दिली. तेव्हा नीलेश चक्क घरात आरामात बसलेला होता. सकाळीच त्याने एकाच वेळी नशेच्या ८ गोळ्या खाल्ल्या होत्या. गांजा प्यायल्याचे सांगत होता.

हत्येच्या तासाभराने आपण कोणाला मारलेय, हेही त्याला आठवत नव्हते. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. यात गंभीर मारहाण, लूटमारीसारखे गंभीर गुन्हे आहेत. नीलेश चव्हाणने अमोलच्या एका मित्राच्या बहिणीची छेड काढली होती. त्‍यावरून अमोल आणि नीलेशमध्ये वाद झाला होता. याच वादातून नीलेशने हत्‍या केल्याची चर्चा आहे. त्‍यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. आठवडाभरातच शहरात नशेखोरांनी ३ जणांची हत्‍या केल्याने चिंता व्यक्‍त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software