१० रुपयांच्या नोटा उचलण्यात चालक गर्क, चोरट्यांनी कारमधून ३ लाखांची बॅग उचलून नेली!, कोकणवाडीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १० रुपयांच्या नोटा कारच्या अवतीभवती फेकून त्‍या नोटा चालकाला दाखवल्या. गाडीतून उतरून नोटा जमा करण्यात चालक व्यस्त असताना २ चोरट्यांनी कारमधून ३ लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक ते रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रोडवरील कोकणवाडी चौकात मंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी (२६ डिसेंबर) दुपारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १० रुपयांच्या नोटा कारच्या अवतीभवती फेकून त्‍या नोटा चालकाला दाखवल्या. गाडीतून उतरून नोटा जमा करण्यात चालक व्यस्त असताना २ चोरट्यांनी कारमधून ३ लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक ते रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रोडवरील कोकणवाडी चौकात मंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी (२६ डिसेंबर) दुपारी १२ च्या सुमारास घडली. या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी शुक्रवारी (२७ डिसेंबर) दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

किशोर रुपचंद सावंत (वय २७, रा. विजयनगर नक्षत्रवाडी, संत कबीर शाळेमागे, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते ठेकेदार राजू राजपूत यांच्या इनोव्हा कारवर (एमएच २० डीझेड ७७७७) चालक आहेत. गुरुवारी (२६ डिसेंबर) सकाळी १० च्या सुमारास ते घरून निघून बन्सीलालनगर येथे राजपूत यांच्या घरी आले. तिथून गाडी घेऊन विपुल स्टेशनरी येथून पाण्याचा बॉक्स, चावी किचन, एअर पॉकिट परफ्‍यूम घेऊन फुलवाल्याच्या दुकानात जाऊन गाडीला हार घेऊन कैलास मार्केट येथे असलेल्या मंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर जाऊन थांबले. दुपारी १२ च्या सुमारास गाडी घेऊन ते राजपूत यांच्या घरी आले.

तिथून राजपूत यांचा मुलगा शिवा यांना गाडीत घेऊन परत ऑफीसला आले. त्यावेळी शिवा ऑफिसमध्ये गेले व सावंत हे गाडीच्या ड्रायव्हर शिटवर बसलेले होते. दुपारी सव्वा बाराला क्रांती चौक ते रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर कोकणवाडी चौक येथे इनोव्हा घेऊन थांबलेले असताना एक व्यक्ती विटकरी रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्‍तीने ड्रायव्हरच्या बाजूने काच वाजवली आणि इशारा केला. सावंत यांनी काच उघडताच १० रुपयांच्या चलनी नोटा पडलेल्या दिसल्या. त्‍यामुळे सावंत हे गाडीतून उतरले आणि नोटा उचलून गाडीमागे गेले. तेव्हा इशारा करणाऱ्या व्यक्तीने गाडीच्या दुसऱ्या बाजूला उभा राहून पुन्हा हाताने इशारा केला तेव्हा पाहिले तर गाडीचे दुसरे बाजूलादेखील १० रुपये दराच्या चलनी नोटा पडलेल्या दिसल्या.

सावंत यांनी त्‍या नोटा जमा करून गाडीत ड्रायव्हर सीटवर येऊन बसले. गाडीत असताना मन्मत कल्याणकर गाडीकडे आले. त्यांनी सावंत यांना विचारले, की गाडीतील बॅग कोठे आहे. तेव्हा सावंत म्हणाले, की गाडीत बॅग होती हे मला माहीत नाही. त्‍यामुळे मन्मत हे परत ऑफिसमध्ये गेले व शिवा यांच्यासोबत परत गाडीकडे आले. गाडी चेक केली असता बॅग गाडीत नव्हती. त्‍यामुळे शिवा व मन्मत दुचाकीवरून घरी गेले. घरून शिवा परत आल्यावर सावंत यांना म्हणाले, मी घरी जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहून आलो आहे. बॅग गाडीत होती. त्यानंतर सर्वांनी ऑफिसचे कॅमेरे चेक केले तर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सावंत नोटा जमा करत असताना एक काळसर रंगाचा शर्ट व पांढरी पॅन्ट घातलेल्या व्यक्तीने गाडीच्या ड्रायव्हर साईडचा मागील दरवाजा उघडून गाडीतून बॅग घेऊन विटकरी रंगाच्या शर्ट घातलेल्या व्यक्तीसोबत रोडचे पलीकडे जाऊन तेथे रिक्षात बसून निघून गेल्याचे दिसले. शिवा यांनी बॅगमध्ये ३ लाख रुपये होते असे सांगितले.
उशिरा दिली तक्रार…
गुरुवारी राजू राजपूत यांना घेऊन गल्लेबोरगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) या ठिकाणी लग्नासाठी गेल्याने रात्री उशीरा आल्यामुळे तक्रार देण्यासाठी शुक्रवारी पोलीस ठाण्यात आल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार प्रदीप डहाके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software