२४ वर्षीय तरुणीला व्हायचे होते लेडी डॉन!; बलात्काराच्या गुन्ह्यातील फरारी तरुणाने पुरवली बंदूक अन्‌ तिने केली फायरिंग!! , छत्रपती संभाजीनगरातील प्रकाराने खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर(सीएससीएन वृत्तसेवा) : २४ वर्षीय राखी गणेश मुरमुरे (वय २४, मूळ रा. स्‍नेहनगर, पोलीस कॉलनी, नांदेड, ह. मु. स्वामी विवेकानंदनगर,एन १२, हडको) हिचा पिस्तुलातून गोळीबार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सिटी चौक पोलिसांनी रविवारी रात्री सापळा रचून भडकल गेट येथे तिला अटक केली. तिच्या खोलीतून एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व तीन चाकू जप्त […]

छत्रपती संभाजीनगर(सीएससीएन वृत्तसेवा) : २४ वर्षीय राखी गणेश मुरमुरे (वय २४, मूळ रा. स्‍नेहनगर, पोलीस कॉलनी, नांदेड, ह. मु. स्वामी विवेकानंदनगर,एन १२, हडको) हिचा पिस्तुलातून गोळीबार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सिटी चौक पोलिसांनी रविवारी रात्री सापळा रचून भडकल गेट येथे तिला अटक केली. तिच्या खोलीतून एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व तीन चाकू जप्त केले. त्यानंतर तिला पिस्तूल कुणी दिले याची चौकशी केली असता जालन्याच्या तरुणाचे नाव समोर आले. जालना जिल्ह्यातील आष्टी येथून त्‍याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्‍याच्याविरुद्ध यापूर्वी सिडको पोलीस ठाण्यात बलात्‍काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र तो दीड वर्षापासून या गुन्ह्यात फरारी होता.

पिस्तूल पुरवणाऱ्याचे नाव किशोर ज्ञानेश्वर जाधव (वय २७, रा. आष्टी जायकवाडी कॅम्‍प, जि. जालना) असे आहे. तो अंबडमध्ये कुख्यात गुन्हेगार म्‍हणून कुपरिचित आहे. त्‍याचे वडील पोलीस अधिकारी आहेत. राखीचे वडीलही पोलीस आहेत. नांदेड शहरातील रहिवासी राखी सुशिक्षित कुटुंबातील असून शिक्षणासाठी काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात आली होती. मात्र, चुकीच्या संगतीमुळे गुन्हेगारांच्या संपर्कात आली. राखीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून, वर्षभरापूर्वी घाटी परिसरात एका मित्राने तिच्यावर पिस्तूल रोखल्याचीही घटना घडली होती.

राखी मुरमुरे ही शेख जावेद ऊर्फ टिप्या ऊर्फ शेख मकसूद, फैजल ऊर्फ तेजा यांच्या संपर्कात होती. किशोरविरुद्ध जालन्यात जीवघेणा हल्ला केल्याचा तर छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात बलात्‍काराचा गुन्हा दाखल केला आहे. तो हॉटेल आणि वाळूचा व्यवसाय करतो. त्‍याचा पलंगावर पाच पिस्तूल आणि ५० राऊंड ठेवून काढलेला व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यातीलच एक पिस्तूल त्‍याने राखीला दिले होते. मात्र नंतर दोघांत टोकाचे वाद होऊन ते वेगळे झाले होते. राखी आणि किशोर यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

लेडी डॉन होण्याचे आकर्षण….
राखीला गुन्हे जगताचे आकर्षण असून यातून तिला लेडी डॉन होण्याचे स्वप्न पडू लागले होते. काही दिवसांपासून ती हवेत गोळीबार करीत असल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर टाकत होती. सिटी चौक पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांना या व्हिडीओतील तरुणी रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास भडकल गेट येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे, उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांनी भडकल गेट येथे सापळा रचला. राखी भडकल गेट येथे येताच अंमलदार राजेंद्र साळुंके, निर्मला कांबळे, संगीता राजपूत, आनंद वाहुळ, करुणा घोडके, नितीश घोडके यांनी तिला चारी बाजूने घेरून ताब्यात घेत ठाण्यात नेले. तेथे अंग झडतीत एक चाकू सापडला. त्यानंतर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांनी ती भाड्याने राहत असलेल्या एन-१२ येथील खोली तपासण्याचे आदेश दिले. खोलीची तपासणी केली असता एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, तीन धारदार चाकू सापडले. पोलिसांनी ते जप्त करत राखीला अटक केली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software